नंदुरबार जिल्हयात ऑरेंज अलर्ट

नंदुरबार जिल्हयात ऑरेंज अलर्ट

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने (Mumbai Regional Meteorological Center) दिलेल्या सूचनेनुसार उद्या दि.१३ जुलै २०२२ रोजी नंदुरबार जिल्ह्यात (Nandurbar district) मुसळधार पाऊस (Heavy rain) शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट (Orange alert) जारी करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, (Citizens should be careful) असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर खांदे यांनी केले आहे.

नंदुरबार जिल्ह्यास हवामान विभागाने दि.१३ जुलै रोजी ऑरेंज अलर्टचा इशारा दिला असल्याने नागरिकांनी पाऊस पडत असल्यास घराबाहेर पडू नये, सखल भागात राहणार्‍या नागरिकांनी वेळोवेळी स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सूचनाचे पालन करावे.

नदी, नाले काठावर राहणार्‍या नागरिकांनी सतर्क राहावे. पुलावरुन पाणी वाहत असल्यास पुल ओलांडू नये. पुलावरुन पाणी वाहत असल्यास पाहण्यासाठी नदी व पुलाजवळ गर्दी करु नये. जुन्या व मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतीचा आसरा घेवू नये.

नदीकाठावरच्या गावातील नागरिकांनी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी काठाजवळ जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावे. कोणतीही जिवीतहानी व पशुहानी होणार नाही याबाबत नागरीकांनी दक्षता घ्यावी. तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे असेही आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com