लायसन्सची परीक्षा उत्तीर्ण असूनही आरटीओ अधिकार्‍यांकडून दिला जातोय त्रास

विचारणा करणार्‍यास अटक करण्याची धमकी
लायसन्सची परीक्षा उत्तीर्ण असूनही आरटीओ अधिकार्‍यांकडून दिला जातोय त्रास

नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR

ऑनलाईन परीक्षा (online exam) व टेस्ट परीक्षा उत्तीर्ण असूनही (License) लायसन्सच्य कागदपत्रांवर सहया करण्यास नकार देत सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांनी (Regional Transport Officer) पुन्हा नव्याने परीक्षा देण्याचे सांगितल्याने संबंधीत उमेदवाराला मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत संबंधीत अधिकार्‍यांना विचारणा केली असता अटक करण्याची धमकी दिल्याचा आरोप उमेदवाराने केला आहे.

याबाबत संबंधीत उमेदवाराने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, (nandurbar) नंदुरबार येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयमध्ये शुभम सुधाकर गंगोळे याने लायसन्ससठी रीतसर ऑनलाईन परीक्षा (RTO Online Test) दिली. त्यात तो उत्तीर्ण झाला.

१७ फेब्रुवारी २०२२ रोजी त्याला लर्निंग लायसन्स देण्यात आले. त्यानंतर २९ मार्च २०२२ रोजी त्याने ड्रायविंग टेस्टसाठी अर्ज केला आणि टेस्ट देऊन उत्तीर्णही झला. त्यावेळी ड्रायविंग टेस्ट इन्चार्ज रोहन जाधव यांनी ड्राईव्ह टेस्ट उत्तीर्ण करुन सही दिली.

त्या दिवशी गैरहजर असलेले सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव हे कार्यालयात उपस्थित नव्हते.म्हणून सदर व्यक्ती त्यांची कागदपत्रांवर सही घेण्यासाठी ३० मार्च २०२२ रोजी आला.

मात्र, जाधव यांनी त्यांना सही देण्यास नकार दिला व पुन्हा अर्ज करुन ऑनलाईन टेस्ट द्या आणि ड्राईव्ह टेस्ट द्या नंतर या कागदांवर सही देऊ, असे सांगितले. आधीच ऑनलाईन परीक्षा, ड्राईव्ह टेस्ट उत्तीर्ण झालेली असतांना अधिकार्‍यांकडून उमेदवारांना त्रास दिला जात आहे.

दलालांमार्फत परीक्षा व टेस्ट ड्राइव्ह उत्तीर्ण होणार्‍या व्यक्तींना कुठलेही कागदपत्र किंवा टेस्ट न देता लायसन्सवर सहया केल्या जातात, असा आरोप या उमेदवाराने केला आहे.

याबाबत संबंधीत उमेदवाराने जाधव यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी कलम ११२ लावण्याची धमकी दिली आणि पुन्हा आरटीओ कार्यालयाच्या परिसरात आढळल्यास अटक करण्याची धमकी दिल्याचा आरोपही या उमेदवारने केला आहे.

त्यामुळे अशा नियमबाहय काम करणार्‍या, दलालांमार्फत न जाता स्वतः परीक्षा व टेस्ट उत्तीर्ण होणार्‍या उमेदवारांना त्रास देणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या उमेदवाराने केली आहे.

Related Stories

No stories found.