अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकास जन्मठेप

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकास जन्मठेप

नंदुरबार Nandurbar । प्रतिनिधी

तालुक्यातील दुधाळे येथील पिडीत अल्पवयीन मुलीस minor girl लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेवून तिच्यावर अत्याचार Tyranny करणार्‍या आरोपीस Accused जिल्हा प्रमुख व सत्र न्यायालयाने Sessions court जन्मठेपेची शिक्षा life imprisonment सुनावली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, 15 वर्षीय पिडीत मुलगी ही तिच्या आईवडील व दोघे भावंडांसह दुधाळे येथे राहत होती. ती लोकमान्य टिळक विद्यालयात इयत्ता आठवीत शिकत होती. दुधाळे गावातीलच राहणारा धिरज पाशा पवार यास पिडीत ही 3 वर्षापासुन ओळखत होती. धिरज हा विवाहीत असून त्याला 3 मुले देखील आहेत. धिरज पाश्या पवार याचे पिडीत मुलीचे घरी नेहमीच येणे-जाणे होते. त्यामुळे त्याची व अल्पवयीन मुलीची ओळख निर्माण झाल्याने त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. धिरज पवार याने पिडीत अल्पवयीन मुलीस तिचे अज्ञानाचा फायदा घेत माझ्या बायकोस सोडुन तुझ्यासोबत लग्न करेल, असे सांगत. त्यामुळे पिडीत मुलीचा धिरज पवार याच्यावर विश्वास बसल्याने त्याने तिच्यावर 3 ते 4 वेळेस अत्याचार केला.

धिरज पवार हा नाशिक येथे मजूरी कामानिमित्त गेला. त्यानंतर तेथन तो अल्पवयीन पिडीत मुलीसोबत मोबाईलव्दारे संपर्कात राहुन त्याने तिला मोटारसायकलने दुधाळे येथून नाशिक येथे पळवून नेले. नंतर नाशिक येथे तिला एका खोलीत ठेवत लग्नाचे खोटे आमिष दाखवून वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केला होता. पिडीत मुलीच्या आईवडीलांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर पोलीसांनी धिरज व पिडीत मुलीस नंदुरबार येथे आणले होते. लग्नाचे आमिष दाखवून व पिडीत मुलीचा अज्ञानाचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केला म्हणून पिडीतेच्या फिर्यादीवरुन धिरज पाशा पवार रा.दुधाळे याच्याविरुध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भादविक 363, 366, 376(3), पोक्सो-4 व 6 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एस. तिवारी यांच्या न्यायालयात होवून आरोपी धिरज पाश्या पवारविरुध्द गुन्हा सिद्ध झाल्याने त्यास दोषी ठरवत न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा तसेच पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 1 वर्ष कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. आरोपीविरुध्द पोसई/कमलाकर चौधरी यांनी दोषारोपपत्र सादर केले होते. सदर खटल्याचे कामकाज अभियोग पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अ‍ॅड. व्ही.सी.चव्हाण यांनी विशेष प्रयत्न केले. पैरवी अधिकारी म्हणुन पोना नितीन साबळे व पोना/गिरीष पाटील यांनी कामकाज पाहिले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com