
मोदलपाडा (Modalpada) ता.तळोदा वार्ताहर
तळोदा येथील कालिका मातेच्या यात्रेनिमित्त (Kalika mata Yatra) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बैल बाजारात (Bull market) साधारण १२०० बैलांची आवक झाली होती. त्यातील ८०० बैलांची विक्री होवून जवळपास एक कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.
दरम्यान, पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या कुकरमुंडा (Kukarmunda) येथील यात्रेचा या बैल बाजारावर परिणाम झाल्याचे दिसून आले. कारण यंदा कमी उलाढाल झाल्याचे सूत्रांनी सांगितले. एरवी आठवडाभर चालणारा हा बाजार चारच दिवसात आटोपला. तळोदा (Taloda) येथील कालिका मातेच्या (Kalika mata) यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेठे ग्राऊंडवर बैल बाजार भरला होता. यासाठी बाजार समितीने जय्यत तयारी केली होती.
दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे बंद पडलेला यात्रोत्सव यंदा भरविण्यात येणार होता. साहजिकच चांगली उलाढाल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. यंदा बैल बाजारात साधारण १२०० बैलांची अवाक आली होती. राजस्थान (Rajasthan), मध्यप्रदेश (Madhya Pradesh), गुजरात (Gujarat) या तीन राज्यातील व्यापाऱ्यांबरोबरच धुळे, जळगाव, साक्री व जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी आपल्या बैल जोड्या विक्रीसाठी आणल्या होत्या. त्यातील ८०० बैलांची विक्री झाली. म्हणजे ४०० बैल परत न्यावे लागले.
या बैल विक्रीतून साधारण एक कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. वास्तविक यंदा बैलांची आवक गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत अधिक होती. मात्र खरेदी, विक्रीला पाहिजे तसा प्रतिसाद लाभला नाही. त्यामुळे बाहेरील व्यापाऱ्यांना नाईलाजास्तव बैलजोड्या परत न्याव्या लागल्यात. बैल जोडीच्या किमतीतदेखील ग्राहकांचा थंड प्रतिसाद होता. कारण पन्नास हजाराच्या आतच बैलजोडी विकली गेली.
यंदाच्या बैल बाजाराच्या मंदीबाबत विचारले असता पंधरा दिवसा पूर्वीचं शहराचा हद्दीवर असलेल्या गुजरात राज्यातील कुकरमुंडा (Kukarmunda) येथील पाटीची यात्रा संपली होती. त्यामुळे खरेदीदारानी तेथूनच बैल खरेदी करून टाकली. त्यामुळे यंदाच्या बैल बाजारात मंदीच्या परिणाम दिसून आल्याचे सांगण्यात आले. एरवी आठवडाभर चालणारा यात्रेतील बैलं बाजार चौथ्याच आवरला गेला.
यात्रेत मात्र तेजी
यंदाच्या बैल बाजारात मंदीचं सावट दिसून आले असले तरी यात्रेत मात्र चांगलीच तेजीच चित्र आहे. नगर पालिकेने आठवडे बाजारांऐवजी अक्कलकुवा रस्त्यावरील प्रशस्त अशा वंजारी मैदानावर यंदा यात्रा भरल्यामुळे यात्रेकरूंची संख्या देखील दिवसागणिक वाढत आहे. त्याचं बरोबर मनोरंजनाची साधने, खेळणी, कटलरी या सारख्या दुकानाबरोबरच शेतीपायोगी साहित्य, मसाले अशा दुकांना मोठ्या प्रमाणात व्यावसायिकांनी थाटल्याने ग्राहकांच्या प्रतिसाद चांगला मिळत असल्याचे व्यापारी सांगतात. त्यातही मनोरंजनाच्या साधनांच्या ठिकाणी महिलांना सुरक्षीतता असल्यामुळे विशेषता महिलांची चांगली संख्या दिसून येत आहे.
नगर पालिकेने यंदा यात्रेसाठी प्रशस्त जागा उपलब्ध करून दिल्याने व्यापारी व यात्रेकरूंनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, पोलिसांनी देखील चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.शिवाय वीज वितरण कंपनीनेही सुरळीत वीजपुरवठा केला आहे.