मालमत्ता करांच्या वसुलीसाठी प्रशासनासोबत आता पदाधिकारीही मैदानात

मालमत्ता करांच्या वसुलीसाठी प्रशासनासोबत आता पदाधिकारीही मैदानात

मोदलपाडा, Modalpada ता.तळोदा | वार्ताहर

तळोदा येथील नगरपालिकेने (Taloda Municipality) मालमत्ता धाराकांकडील (property holders) थकीत व चालू घरपट्टी वसुलीसाठी (Recovery) आता पालिका पदाधिकारी यांच्या सोबतच महसूल प्रशासनही पुढे सरसावले आहे. नगराध्यक्षांच्या कार्यालया समोर लावलेल्या वसुली कॅम्पमध्ये (Recovery camp) पाच लाख रुपयांची रक्कम गोळा झाली.

तळोदा नगर पालिका (Taloda Municipality) हद्दीत साधारण ६ हजार मालमत्ताधारक आहेत. या मालमत्ता धारकांकाडे विविध करापोटी नगर पालिकेची १ कोटी २३ लाख रुपयांची थकबाकी (Arrears) आहे. ही थकीत घरपट्टी वसुलीसाठी पालिका गेल्या जानेवारी महिन्यापासून प्रयत्न करीत आहे. त्यासाठी मालमत्ता धारकांच्या घरासमोर वाजंत्री (Vajantri) वाजवण्याचा प्रयोग राबविण्यात आला होता. तरीही वसुलीस पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नव्हता. कारण आतापावेतो केवळ ३६ लाख रुपयांची थकबाकी व चालू वसुलीची रक्कम पालिकेकडे जमा झाली होती.

घरपट्टी वसुलीचा हा थंड प्रतिसाद लक्षात घेवून नगराध्यक्ष अजय परदेशी व तहसीलदार गिरीश वाखारे यांनी घरपट्टी वसुलीसाठी गुरुवारी नगराध्यक्षांच्या कार्यालयासमोर (mayor's office) कॅम्प लावला होता. नगराध्यक्ष परदेशी यांनी स्वतः मालंमत्ताधारकांशी भ्रमणध्वनीने संवाद साधून घरपट्टी भरण्याची विनंती केली होती. नवीन वसाहत धारकांनी स्वतः पुढे येवून पालिकेची थकीत घरपट्टीची रक्कम भरून पावती घेतली. एकाच दिवसात साधारण ५ लाखांची घरपट्टीची रक्कम मिळाल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले. घरपट्टी वसुलीसाठी पालिकेचे कार्यालय अधीक्षक राजेंद्र माळी, कर निरीक्षक राजेश पाडवी, मोहन माळी, नितीन शिरसाठ, सुनील माळी आदी परिश्रम घेत आहेत.

तळोदा पालिकेने सहा हजार मालमत्ता धारकाना बजावल्या नोटिसा

येथील पालिकेने थकीत घरपट्टी वसुलीसाठी शहरातील साधारण सहा हजार मालमत्ता धारकांना (property tax) नोटिसा देखील बजावल्या आहेत. त्यासाठी आवश्यक कार्यवाही सुध्दा करण्यात आली होती. मात्र पालिकेच्या या नोटिसाबाबत (Notice) नवीन वसाहतमधील रहिवाश्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. वसाहतीत पालिकेने सध्या नागरी सुविधा (Civic amenities)दिलेल्या नाहीत. त्यामुळे पालिकेचा कुठलाही कर न भरण्याचा इशारा प्रशासनास दिला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com