बोहरा भगिनींचा 20 ऑक्टोबरला दिक्षा समारंभ

उद्या नंदुरबारात शोभायात्रा
बोहरा भगिनींचा  20 ऑक्टोबरला दिक्षा समारंभ

नंदुरबार Nandurbar । प्रतिनिधी

येथील व्यापारी रमेशचंद बोहरा (Trader Rameshchand Bohra) व निर्मलाबाई बोहरा यांच्या कन्या प्रेरणा बोहरा (Prerna Bohra) व स्नेहा बोहरा (Sneha Bohra) या दोन्ही भगिनी दि.20 ऑक्टोबर रोजी राजस्थान (Rajasthan) राज्यातील नोखामंडी (Nokhamand) येथे प.पू. ज्ञान गच्छाधिपति श्रृतधर पंडितरत्न श्री. प्रकाशचंदजी म.सा.यांच्या सान्निध्यात जैन भागवती दिक्षा (Jain Bhagwati Diksha) धारण करणार आहेत. दरम्यान, यानिमित्ताने दि.10 ऑक्टोबर रोजी नंदुरबारात त्यांची शोभायात्रा (Parade) काढण्यात येणार आहे.

नंदुरबार येथील व्यापारी व मुळचे अक्कलकुवाचे रहिवाशी रमेशचंद गेनमलजी बोहरा व सौ.निर्मलाबाई रमेशचद्र बोहरा यांची सुकन्या व नथमल खेतमल कोटडीया नंदुरबार यांची नात मुमुक्षु प्रेरणा बोहरा (वय 19 वर्षे, पदवीधर) तसेच मुमुक्षु स्नेहा बोहरा (वय 21, शिक्षण एम.एससी) या दोन्ही भगिनी दि.20 ऑक्टोबर 2021 रोजी राजस्थान राज्यातील नोखामंडी या गावी परमपुज्य ज्ञान गच्छाधिपति श्रृतधर पंडितरत्न श्री. प्रकाशचंदजी म.सा. यांच्या सानिध्यात जैन भागवती दिक्षा धारण करणार आहेत.

सदर बोहरा भगीनीचे जैन भागवती दिक्षा महोत्सवानिमीत्त नंदुरबार येथील आदेश्वरनगर येथील जैन स्थानकापासून अग्रवाल भुवन नंदुरबार येथे दि. 10 ऑक्टोबर 2021 रोजी शोभायात्रा निघणार असून तेथेच शोभयात्रेचा समारोप होणार आहे.

सकल जैन समाजाने सकाळी 11 वाजता दिक्षार्थी भगीनींचा अभिनंदन समारंभ श्री जैन स्थानकवासी संघ, नंदुरबार आणि रमेशचंद बोहरा परीवारातर्फे दि.10 ऑक्टोबर 2021 रोजी आयोजीत केला आहे. सदर कार्यक्रम हे कोरोना नियमांचे पालन करुन मर्यादीत संख्येच्या उपस्थितीत होणार आहे. त्यासाठी समाज बांधवांनी सहकार्य करावे, असे आवाहन अयोजकातर्फे करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.