नंदुरबार नगरपालिकेत लोकशाही नव्हे हुकूमशाही- माजी आ. शिरीष चौधरी

नंदुरबार नगरपालिकेत लोकशाही नव्हे हुकूमशाही- माजी आ. शिरीष चौधरी

नंदुरबार Nandurbar । प्रतिनिधी

नंदुरबार नगरपालिकेच्या (municipality) नियोजना अभावी पाणीटंचाई (Water scarcity) निर्माण झाली आहे.पालिकेत नागरीकांचे कोणतेही काम असो ते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी (Former MLA Chandrakant Raghuvanshi) यांना विचारल्याशिवाय होत नाही, त्यामुळे नगरपालिकेत लोकशाही नव्हे तर हुकूमशाही (Not a democracy but a dictatorship) कारभार सुरू आहे, असा आरोप माजी आमदार शिरीष चौधरी (Shirish Chaudhary) यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे.

नंदुरबार येथे पत्रकार परिषदेत माजी आमदार शिरीष चौधरी म्हणाले की, नंदुरबार नगरपालिकेने विरचक धरणात 50 टक्के पाणीसाठा असल्याने नंदुरबार नगरपालिकेतर्फे दसर्‍याच्या दुसर्‍या दिवसापासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा बाबत ते श्री.चौधरी म्हणाले की, विरचक धरण, आंबेबारा धरण फुल भरले आहेत. असे असताना दि. 16 ऑक्टोंबर पासून शहरातील नागरिकांना दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची घोषणा करून वेठीस धरण्याचे काम करण्यात येत आहे. त्यांच्या झराळी येथील फार्म हाऊस मध्ये पाणी घुसायला नको, म्हणून त्या धरणाचे पाणी सोडले जाते, असा आरोप देखील या पत्रकार परिषदेत चौधरी यांनी केला. चोवीसतास पाणी देण्याचे आश्वासन नगरपालिका निवडणुकीत माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिले होते, मग आता दोन दिवसाआड पाणी देण्याचे कारण काय? असा सवाल चौधरी यांनी उपस्थित केला आहे,

नंदुरबार शहरातील मोकाट गुरांमुळे दोन लोकांचा बळी गेला आहे. याबाबत भाजपाच्या नगरसेवकानी फलकबाजी लावून लक्ष वेधले होते. त्यावर माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सोशल मीडियावर उत्तर दिले. त्यानंतर दि 12 ऑक्टोबर रोजी माजी आमदार शिरीष चौधरी यांनी प्रतिउत्तर देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, शहरात मोकाट गुरे फिरत असतील आणि त्यांच्यामुळे लोकांचे नुकसान होत असेल तर त्याची पूर्ण जबाबदारी ही नगरपालिकेची , असा कायदा आहे. ही जबाबदारी जर सत्ताधारी पदाधिकारी नाकारत असतील तर मग लाखो रुपये खर्चून मोकाट गुरे पकडण्याचे टेंडर का काढले जाते? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. जर तुमच्या ने नियोजन होत नसेल तर पाणी पुरवठ्याची जबाबदारी आमच्याकडे द्या, आम्ही या परिस्थितीत देखील जनतेला रोज पाणीपुरवठा करून दाखवतो, असेही आव्हान भाजपचे जिल्हा अध्यक्ष विजय चौधरी यांनी दिले आहे. या पत्रकार परिषदेत भाजपचे नगरसेवक चारुदत्त कळवणकर,आंनद माळी, गौरव चौधरी, प्रशांत चौधरी, संतोष वसईकर, लक्ष्मण माळी,प्रशांत चौधरी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.