धडगावची नवी कोरी रुग्णवाहिका निघाली तोरणमाळच्या पर्यटनाला ...

धडगावची नवी कोरी रुग्णवाहिका निघाली तोरणमाळच्या पर्यटनाला ...

नंदुरबार । Nandurbar। प्रतिनिधी

धडगाव (Dhadgaon) येथील दुर्गम भागातील एकमेव अश्या ग्रामीण रुग्णालयाला नवजात शिशुसाठी (newborns) देण्यात आलेली नवीन सरकारी रूग्णवाहिका (ambulance) चक्क पर्यटणासाठी तोरणमाळ (Toranmal) येथे नेवून दिवसभर पर्यटन (Tourism) केल्याचा प्रकार येथील काही कर्मचार्‍यांनी केल्याचे उघड (Revealed by employees) झाले आहे. विशेष म्हणजे या नवीन रुग्णवाहिकेचा लाभ अद्याप एकाही रुग्णालय मिळालेला नाही. त्यातच वेळीच उपचारासाठी दोन बालकांना रुग्णवाहिकेची आवश्यकता (Children need an ambulance) असतांना ती मिळू न शकल्याने एकाला दुसर्‍या 108 रुग्णावाहिकेतून नंदुरबार येथे हलविण्यात आले, तर एकाला आपल्या प्राणास मुकावे (Miss life) लागल्याचे समजते.

धडगाव या अतिदुर्गम तालुक्यातीलसर्वच रुग्णवाहिकांची अवस्था आधीच दयनीय झाली आहे. शासनाने नुकतीच नवजात शिशुच्या सोयीसाठी अद्ययावत अशी रुग्णवाहिका येथील ग्रामीण रुग्णालयाला दिली आहे. तिचा वापर अद्यापपर्यंत कोणत्याही रुग्णासाठी करण्यात आलेला नसतांना धडगांव सरकारी रुग्णालयातील कर्मचाऱी चालक दिगंबर चटपले, क्लार्क किशोर भदाणे, औषध निर्माता सुनील भिवगडे सह मित्रांनी थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ येथे रविवारच्या सुट्टीची संधी साधून नेल्याचा प्रकार उघडकीस आला.

एरव्ही रुग्णांना जुन्या अ‍ॅम्बुलन्सने उपचारासाठी धडगांव येथून नंदुरबार येथे रवाना केले जाते, तर नव्या कोर्‍या अ‍ॅम्ब्युलन्सचा वापर कर्मचारी स्वतःला पर्यटनासाठी वापरत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. रविवारी सकाळी 6 वाजता रुग्णवाहिका घेऊन निघालेले कर्मचारी रात्री पावणे अकरा वाजता परत आले. या प्रकरणाचा छडा येथील शिवसेनेचे पदाधिकारी पिंटू वळवी व बिरसा फायटर्सचे धडगांव महासचिव प्रदिप पावरा यांनी समोर आणला आहे.

धडगांव सरकारी रुग्णालयातील अ‍ॅम्बुलन्स रविवारची सुट्टीची संधी साधून रुग्णालयातीलच कर्मचार्‍यांनी चक्क तोरणमाळ या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटणासाठी नेल्याचे कळताच धडगांवच्या पदाधिकार्‍यांनी लगेच धडगांव ग्रामीण रुग्णालय गाठले. तेथे संबंधित अधिकार्‍यांना जाब विचारला. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

धडगांव सारख्या दुर्गम भागात रुग्णांचे हाल होऊ नयेत, म्हणून सरकारी दवाखान्यात अनेक सोयी सुविधा शासन करत आहेत. परंतु या सोयी सुविधांचा वापर हे रूग्णांऐवजी तेथील कर्मचारीच आपल्या वैयक्तिक जीवनात मजा करायला करत आहेत, असा आरोप शिवसेनेचे पदाधिकारी पिंटू वळवी व बिरसा फायटर्सचे महासचिव प्रदिप पावरा यांनी केला आहे.

अनेकदा रुग्ण भंगार अ‍ॅम्बुलन्समध्ये धडगांव येथून नंदुरबार येथे नेताना मरण पावले आहेत. तरी रुग्णांसाठी भंगार अ‍ॅम्बुलन्स वापरली जाते व चांगली अ‍ॅम्बुलन्स तोरणमाळला मजा मारायला नेली जाते,हे चुकीचे घडत आहे. तोरणमाळ येथे मजा मारायला अ‍ॅम्बुलन्सने नेणार्‍या कर्मचार्‍यांना तात्काळ निलंबित करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा बिरसा फायटर्स धडगांव शाखेने प्रशासनाला दिला आहे.

तोरणमाळहून धडगांवला आल्यानंतर आतील मजा मारणारे मित्र कर्मचारी फरार झाले.फक्त चालक व क्लार्कच गाडीत सापडले असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, संबंधित नवजात शिशु रुग्णावाहिका ग्रामीण रुग्णालयात नसल्याने दुपारी दीडच्या सुमारास मांडवी येथील तन्वी गुलाबसिंग वळवी नामक बालकास उपचारासाठी नंदुरबार येथे हलविणे गरजेचे असल्याने 108 रुग्णावाहिकेने नेण्यात आले.

या अ‍ॅम्ब्युलन्समध्ये ऑक्सिजनची सुविधा नसल्याने रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये धाकधूक दिसून आली. तर भूजगाव येथील अत्यवस्थ बालकास नातलगंनी मोटारसायकलवर बसून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आणले असता तोपर्यंत तो बालक दगावला होता. तो बालक दगवला नसता तर त्यालाही नंदुरबार येथे हलवावे लागले असतें मात्र, रुग्णवाहिका नसल्याने रुग्णाची गैरसोय झाली असती. असा आरोप नातलगानी यावेळी केला.

संबंधित चालकांनी मला न विचारता, परवानगी न घेता परस्पर तोरणमाळ येथे अम्बुलन्स नेली,असे लेखी पत्र संबंधित प्रमुख डॉक्टरांनी पदाधिकार्‍यांना दिले आहे. लाखाची अ‍ॅम्बुलन्स रुग्णांसाठी न वापरता ऐश करायला तोरणमाळ येथे नेली म्हणून लोकांत संताप निर्माण झाला आहे.

मला कल्पना न देता रुग्णावाहिका नेण्यात आली आहे. रुग्णावाहिकेचे इंस्टॉलेशन अजून बाकी आहे. अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय धडगावचे डॉ. किरणकुमार वानखेडे यांनी दिली. रुग्णांना सेवा न देता शासकीय वाहनांचा वापर खाजगी पर्यटणासाठी करण्यात आला आहे. हा प्रकार अत्यंत धक्कादायक असा आहे. संबंधित्तांची चौकशी करून तात्काळ निलंबन करावे अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा पिंटू वळवी यांनी दिला आहे

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com