अक्कलकुवा येथील नेहा गोलेच्छा घेणार दिक्षा

अक्कलकुवा येथील नेहा गोलेच्छा घेणार दिक्षा

अक्कलकुवा Akkalkuwa । प्रतिनिधी-

निवासी मुमुक्षु नेहा नरेश गोलेच्छाची (Neha Golechha) दिक्षा समारोह (take initiation) अक्कलकुवा येथे 29 मे 2023 रोजी करण्याची घोषणा (Declaration) आचार्य पियूषसागरजी (Acharya Piyushsagarji) यांनी कोटा (राजस्थान) येथील दानबाडी दादावाडीत केली. याप्रसंगी नेहा सहित कुटुंबाचे 50 सदस्य उपस्थित होते.

या समारोहात खेतिया ह.मु. पुना अलका भंसाली, रायपूरनिवासी प्रज्ञा पारख यांनीदेखील दीक्षेला स्वीकृती दिली. दीक्षा मुहूर्त प्रदान समारोहात पूज्य समर्पित रत्नसागरजी महाराज यांनी, आम्ही सर्व सुखी रहाणे इच्छितो.सांसारिक सुख हे क्षणिक तर दीक्षार्थी शाश्वत सुखासाठी अग्रेसर होत आहे. त्यांचे हृदय परिवर्तन झाले आहे. दीक्षार्थी नेहा गोलेच्छाने सांगितले, मी संयुक्त कुटुंबात राहते.

मला लहानपणापासून धार्मिक संस्कार मिळत गेले. त्यावेळी कुटुंबातील कोणी दीक्षा घेईल याचा विचार सुद्धा मनात आला नाही. पूज्य प्रज्ञाश्रीजी महाराज यांची कृपा झाली, काही स्वाध्वी यांच्याशी भेट झाली. जन्म मृत्यू एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मृत्यू हा दुसर्‍या जीवनाची प्रस्तावना आहे. याच्यापुढे स्टोरी जात नाही. जे पुण्य जमा झाले, त्याचा परिणाम मिळाला.

तीर्थंकरांचे जिन शासन प्राप्त झाले. एक साधुजी यांच्याशी वार्तालाप करतांना त्यांनी सांगितले, संयम घेण्यास उशीर करू नको, लवकर निर्णय घे. मी निर्णय घेतला, आता मला दिक्षा घेऊन संयमी जीवन जगायचे आहे. आज दिक्षाचा मुहर्त घेण्यासाठी कुटुंबासोबत येथे आली आहे असे सांगितले.कोटा जैन संघाने दीक्षार्थी व त्यांच्या कुटुंबीयांचे हर्षोल्हासात स्वागत केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com