नवापुरात राष्ट्रीय महामार्गावर ‘दी बर्नींग कार’ चा थरार

वाहन जळले की जाळले? शहरात चर्चा
नवापुरात राष्ट्रीय महामार्गावर ‘दी बर्नींग कार’ चा थरार

नवापूर | श.प्र.- NAVAPUR

शहरालगत राष्ट्रीय महामार्गावर (National Highways) शुक्रवारी रात्री दहा ते साडे दहा वाजेच्या सुमारास कारला आग लागल्याची घटना घडली.

शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास महामार्ग क्रमांक ६ डायमंड पोल्ट्री फार्म जवळ एक चारचाकी वाहन जळतांना दिसून आल्याने खळबळ उडाली होती. आग एवढी भीषण होती की वाहन कोणत्या कंपनीचे आहे तेदेखील कळले नाही.

गाडीला लागलेल्या आगीची दाहकता बघून नवापूर शिवसेनेचे पदाधिकारी दर्पण पाटील यांनी लागलीच नगराध्यक्षांना फोन करून तात्काळ घटनेची संपूर्ण माहिती देऊन अग्निशामक बंब पाठविण्याची मागणी केली.

तसेच शिवसेनेचे उपजिल्हा संघटक मनोज बोरसे, शहरप्रमुख गोविंद मोरे यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी तात्काळ अग्निशामक जेष्ठ कर्मचारी संतोष सोनार यांच्याशी संपर्क करून त्यांना घटनेची संपूर्ण माहिती दिली.

पालिकेच्या अग्निशमन बंबच्या साह्याने कर्मचार्‍यांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण तर मिळाले तरी पण वाहन मात्र पूर्णपणे जळून खाक झाले आहे.

आग विझवल्यानंतर वाहनांच्या आत बाहेरून कोणतेही कागदी पुरावे न सापडल्याने फक्त वाहनाच्या नंबर प्लेटवरून वाहन गुजरात बडोदा पासिंग असल्याचे समजले आहे.

सदर वाहन जाळले की जळाले याबाबत शहरात चर्चा रंगली आहे. घटनास्थळी उपनिरीक्षक मनोज पाटील, प्रविण कोळी, पोहेकॉ विकास पाटील, पंकज सूर्यवंशी, योगेश थोरात, विनोद पराडके, हेमंत सैंदाणे आदींनी भेट दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com