संततधार पावसामुळे नवापूर तालुका जलमय

विसरवाडी येथील सरपणी नदीच्या पुलावरुन पाणी, महामार्गावरील वाहतूक ठप्प, दहा गावांचा संपर्क तुटला
संततधार पावसामुळे नवापूर तालुका जलमय

नवापूर Navapur । श.प्र.-

तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे (incessant rains) आणि ठेकेदारांच्या (contractor) चुकीच्या धोरणामुळे (wrong policy) तालुक्यातील अनेक गावांना जोडलेले (Connected to villages) पूल वाहून गेल्याने (carrying the bridge) जवळजवळ आठ ते दहा गावाचा संपर्क तुटला (Contact lost) असल्याची माहिती मिळाली आहे. विसरवाडी (Visarwadi) जवळ राष्ट्रीय महामार्ग काम (National highway work) प्रगतीपथावर आहे. या रस्त्यासाठी सरपणी नदीच्या (Sarpani river) पुलावरुन पर्यायी (Alternative transport from the bridge) वाहतूक सुरु आहे. मात्र, सरपणनी नदीला पूर आला असून या पुराचे पाणी पुलावरून वाहत असल्यामुळे पुलावरील वाहतूक ठप्प (Traffic jams) झाली होती.

तालुक्यातील देवलीपाडा, केशव फळी, िीमदर्डा, अडसापाडा, मोतीझिरा, वागदी, पाटील फळी, सदर गावाचा संपर्क तुटल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. परिसरातील नागरिकांना तसेच शाळा कॉलेजला येणार्‍या विद्यार्थ्यांची पंचाईत झाली असून स्थानिक प्रशासन दाखल झाले आहे. तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट देऊन तत्काळ उपाय योजना करण्याचा सूचना केल्या. वेळ पडल्यास नागपूर अमरावती कडून येणारी वाहतूक नंदुरबारमार्गे तर गुजरातमधून येणारी वाहतूक उच्छल मार्गे वळवण्यात आली आहे.

कॉलनीला आले नदीचे स्वरूप

नगर परिषदेचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला असून इस्लामपुरा, प्रभाकर कॉलनी, परिसराला नदीचे स्वरूप आल्याचे दिसून आले आहे.

नगर परिषदेकडून पावसाळ्यापूर्वीचे नियोजन झालेले नसल्याने नाल्यामध्ये घाणीचे साम्राज्य तयार होऊन संपूर्ण नाला बंद झाला असल्याने आय.टी.आय. लाखाणी पार्ककडून वाहणारे पावसाचे पाणी प्रभाकर कॉलनीतून जाणार्‍या पाण्याला अडथळा निर्माण झाल्याने संपूर्ण कॉलनी परिसराला नदीचे स्वरूप आले होते.

परिसरात रस्त्याचे कडेला असणार्‍या घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झालेले दिसून आले होते. पाण्याचा निचरा करण्यासाठी नागरिक स्वतः रस्त्यावर उतरले होते. स्थानिक नगरसेवकांनी नागरिक कचरा नाल्यात टाकत असल्याचे आरोप करत असून पूर्ण रोष त्यांनी नागरिकांवर व्यक्त झालेला पहावयास मिळाला आहे. तसेच नवापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील विसरवाडी गावाजवळ पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक 8 तासापासून बंद करण्यात आली. या मार्गावरील वाहतूक दहिवेल नंदुरबार मार्गाने वळविण्यात आली आहे.

तालुक्यातील डोकारे कारखान्याजवळील जिल्हा मार्गदेखील बंद करण्यात आला असल्यामुळे सदर वाहतूक याच मार्गाने वळविण्यात आली आहे. यासाठी धुळे-सुरत या राष्ट्रीय महामार्गावर विसरवाडी गावाजवळ विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विसरवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाला वाहतूक वळण्यासाठी तैनात करण्यात आले आहे.

नवापूरहून विसरवाडीच्या दिशेने जाणारी वाहतूक वळविण्यात आली असल्याने सदर ठिकाणी नवापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ, पो.हे.कॉ. विकी वाघ, पंकज सूर्यवंशी यांचे पथक तैनात करण्यात आले आहे. नवापूर विसरवाडी गावादरम्यान या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे, याबाबत सर्व वाहनधारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com