बारी येथे दीड लाखाचा अवैध लाकूड साठा जप्त

वनविभागाची कारवाई, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
बारी येथे दीड लाखाचा अवैध लाकूड साठा जप्त

नवापूर - Navapur - श.प्र :

तालुक्यातील बारी येथे सुमारे दीड लाखांचा अवैध लाकूड साठा वनविभागाने जप्त केला आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक वनसंरक्षक धनंजय पवार यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून राजेंद्र पवार वनक्षेत्रपाल नवापूर, प्रशांत हुमणे वनक्षेत्रपाल रोहयो नंदुरबार, वनपाल युवराज भाबड, कु.आरती नगराळे, नितीन मंडलिक आदी वनकर्मचार्‍यांनी बारी गावात जाऊन

रवि रुस्तुम कोकणी, अनिल तुकाराम कोकणी, पिंटू कोकणी (रा.बारी) यांच्या घराची सर्च वॉरंटने झडती घेतली असता तेथे पलंग 1 नग, दिवाण 1 नग व 121 साग नग कट साइज व फिनिश टिंबर माल अंदाजे 3 ते 3.5 घ.मि. साग व सिसम माल मिळून आला. सदर मालाची बाजारभावानुसार अंदाजीत किंमत 1 ते दीड लाख रुपये आहे.

सदर कार्यवाही मुख्य वनसंरक्षक धुळे दि.वा.पगार, उपवनसंरक्षक नंदुरबार वनविभाग एस.बी.केवटे, शहादा, उमेश वावरे, विभागीय वनअधिकारी दक्षता धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

वन व वन्यजीव तसेच अवैधवाहतूक लाकूड संबधित कुठाला गैरप्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ टोल फ्री नंबर 1926 वर संपर्क करावा, असे आवाहन वनविभागातर्फे करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com