नवापुरात मोटारसायकलीची चोरी

मोटारसायकल चोरटा सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद
नवापुरात मोटारसायकलीची चोरी

नवापूर - Navapur - श.प्र :

नवापूर शहरातील नारायणपूर रोडवरील शिवम बीअर बारनजीक पार्किंग केलेली (एम.एच.39 के. 2655) काळ्या रंगाची स्प्लेंडर मोटरसायकल तीन दिवसापूर्वी दोन अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. मोटरसायकल चोरीचा प्रकार शिवम बिअर बारच्या सीसीटीव्ही कॅमेरेत कैद झाला आहे.

नवापूर तालुक्यातील सुकवेल गावातील ग्रामस्थ हसमुख वळवी नवापूर शहरातील बाजारपेठेत मोटरसायकलीने आले होते. मोटरसायकल पार्किंग करून बाजार करत असताना दोन चोरट्यांनी मालक नसल्याची संधी साधत मोटरसायकल काही क्षणात लंपास केली.

भरदिवसात मोटरसायकल चोरीची घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले आहे. नवापूर पोलीसांना भरदिवसा मोटरसायकल चोरी घटना आवाहन देत आहे.

यासंदर्भात मोटरसायकलीचे मालक हसमुख वळवी यांनी मोटरसायकल चोरीची तक्रार नवापूर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.तीन दिवसातून देखील मोटरसायकलीचा तपास लागला नाही.

नवापूर पोलीस ठाण्यात निम्म्याहून अधिक नवीन पोलीस कर्मचारी आले आहेत. त्यांचा संपर्क व अनुभव कमी असल्याने मोटरसायकल चोरीचा तपासात अडचणी येत असल्याचे बोलले जात आहे.

मोटरसायकल चोरीच्या तपासात चतुर असलेले पोलीस हेडकॉन्स्टेबल दादाभाई वाघ यांची मागणी नवापूर पोलीस ठाण्यात केली जात आहे.

सध्या चिंचपाडा दुरक्षेत्र येथे त्यांची नेमणूक आहे. ते नवापूर पोलीस ठाण्यात असताना 20-25 मोटरसायकल हस्तगत करून मोटरसायकल चोरट्यांना जेरबंद केले होते.

वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी उपाययोजना करून चोरीच्या मोटरसायकलीचा लवकर तपास करावा अशी मागणी होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com