नंदुरबार तालुक्यात सरपंच पदासाठी ३१५ तर सदस्य पदासाठी १ हजार ४४७ उमेदवारी अर्ज दाखल

निवडणूक कामात हलगर्जीपणा केल्यामुळे मंडळ कृषी अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
नंदुरबार तालुक्यात सरपंच पदासाठी ३१५  तर सदस्य पदासाठी १ हजार ४४७ उमेदवारी अर्ज दाखल

नंदुरबार Nandurbar | प्रतिनिधी

तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी (Gram Panchayat elections) उमेदवारी अर्ज (Nominations filed) दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी सरपंच पदासाठी (post of Sarpanch) १७१ तर सदस्य पदासाठी (post of member) ७९६ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल (candidates filed) केले आहेत. आतापर्यंत सरपंच पदासाठी एकुण ३१५ तर सदस्य पदासाठी एकुण १ हजार ४४७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, निवडणूक कामकाजात हलगर्जीपणा केल्यामुळे मंडळ कृषी अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदुरबार तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे प्रक्रिया सुरू आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती. आज शेवटच्या दिवशी सरपंच पदासाठी १७१ तर ग्रामपंचायत सदस्य पदासाठी ७९६ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. आतापर्यंत सरपंच पदासाठी एकुण ३१५ तर सदस्य पदासाठी १ हजार ४४७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान, श्रीरामपूर, खामगाव व नागसर या गावांचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील मंडळ कृषी अधिकारी उमेशराव जगतराव भदाणे है काम पाहत होते, त्यांनी निवडणूक कामात हलगर्जीपणा केल्यामुळे आज प्राधिकृत निवडणूक निर्णय अधिकारी तथा निवासी नायब तहसीलदार बी.ओ.बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भदाने यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com