नंदुरबार पोलिसांची अनाथ मुलांसोबत दिवाळी साजरी

पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या संकल्पनेतून उपक्रम
नंदुरबार पोलिसांची अनाथ मुलांसोबत दिवाळी साजरी

नंदुरबार । nandurbar। प्रतिनिधी

कोरोनामुळे 2 वर्षांनंतर संपूर्ण देश मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी (Celebrating Diwali) करीत असताना नंदुरबार पोलीसांनी (Nandurbar Police) दिवाळीत (Diwali) अनाथांच्या चेहर्‍यावर (face of orphans) हसू फुलवले (Smiled) आहे.

पोलीस अधीक्षकांच्या संकल्पनेतून अनाथ मुले व गरीब परित्यक्ता महिला यांच्यासोबत मिठाईसह या अनाथ मुलांना कपडे व परित्यक्ता महिलांना साड्या देऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करुन नंदुरबार पोलीसांनी दिवाळीचा आनंद द्विगुणित केला आहे. तळागाळातल्या घटकांसोबत आपला आनंद वाटल्यांने तो दुप्पट झाल्याचे समाधान या पोलीसांच्या एरव्ही कडक वाटणार्‍या चेहर्‍यावर दिसत होता तर दुसरीकडे पोलीसांची ही वेगळी प्रतिमा या अनाथ मुलांच्या व परित्यक्ता महिलांच्या चेहर्‍यावरील आनंदात ठळकपणे दिसत होती.

या अनाथ मुलांनीही रिटर्न गिफ्ट म्हणून पोलीसांना स्वतःच्या हाताने बनवलेली भेटकार्ड भेट दिली.कागदाच्या पुठ्यांवर स्वःताच्या हाताने बनवलेली ही भेटकार्डे या दिवाळीची सर्वात अनमोल भेट असल्याचे व रिटर्न गिफ्ट देण्याची या मुलांची भावना त्याहून अनमोल असल्याचे नंदूरबारचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी सांगितले.पोलीस अधीक्षक कार्यालयात ही भेटकार्ड लावण्यात येणार आहेत.

यावेळी कार्यक्रमला उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण खेडकर, अकलकुवा पोलीस निरीक्षक आगरकर, नंदुरबार तालुका पोलीस निरीक्षक राहूल पवार,पोलीस निरीक्षक अर्जुन पटले, शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल नंदवाळकर, म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवुत्ती पवार,उपनगरचे पोलीस निरीक्षक बधाणे आदी उपस्थीत होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com