नंदुरबार,नवापूर तहसिल कार्यालयातर्फे महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी,कर्मचार्‍यांचा सन्मान

जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते लाभार्थ्यांना धनादेश,विविध दाखले, शिधापत्रिका व प्रमाणपत्राचे वाटप
नंदुरबार,नवापूर तहसिल कार्यालयातर्फे महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी,कर्मचार्‍यांचा सन्मान

नंदुरबार Nandurbar। प्रतिनिधी

तहसिल कार्यालय, नंदुरबार व नवापूर येथे महसुल दिनानिमित्त (Revenue Day) आयोजित उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी (Excellent officers and staff) यांचा सन्मान सोहळा (honor ceremony) लाभार्थ्यांना धनादेश, विविध दाखले, शिधापत्रिका व प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी मनीषा खत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल,पोलीस उपविभागीय अधिकारी सचिन हिरे, तहसिलदार भाऊसाहेब थोरात, नायब तहसिलदार नितीन पाटील,आर.ओ.बोरसे आदी उपस्थित होते

.या वेळी मान्यवराच्या हस्ते सातबारा वरील पोटखराब वर्ग अ क्षेत्र वाहितीलायक झाल्यावर केलेल्या सातबारा उतारा फेरफार पत्रकाचे पत्रकाचे वाटप, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, रहिवासी प्रमाणपत्र , नविन शिधापत्रिका, विधता व निराधार प्राधान्य कुटूंब लाभार्थ्याचे प्रमाणपत्र, राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजनेतंर्गत मंजूर धनादेश वाटप करण्यात आले. तसेच नैसर्गिक आपत्ती खरीप 2021 चे दुष्काळ अनुदानाचे 22 कोटी 53 लक्षाचा धनादेश शेतकर्‍यांना वितरीत करण्यासाठी युनियन बँक ऑफ इंडिया यांना प्रातिनिधीक स्वरुपात प्रदान करण्यात आला.

महसूल दिनानिमित्त तहसिल कार्यालयातील उल्लेखनिय कार्य केलेल्या नायब तहसिलदार नितीन पाटील, अव्वल कारकुन प्रिती पाटील,महसूल सहायक दौलत वळवी, मंडळ अधिकारी मदन काबळे, तलाठी बाळू धनगर, शिपाई गिरीष देवांग कोतवाल किशोर पाडवी यांचा मान्यवराच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री व पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक तहसिलदार भाऊसाहेब थोरात यांनी तर आभार प्रदर्शन नितीन पाटील यांनी केले.

नवापूर येथे महसुल दिन साजरा

नवापूर तहसिल कार्यालयामार्फत महसुल दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम नवापूर टाऊन हॉल येथे घेण्यात आला होता.

अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी मनिषा खत्री, प्रांताधिकारी मिनल करनवाल उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित मान्यवराच्या सत्कार तहसिलदार मंदार कुलकर्णी यांनी केला. यावेळी नायब तहसिलदार जितेंद्र पाडवी, सुरेखा जगताप, दिलीप कुलकर्णी, एस.एल.चिखले आदी उपस्थित होते. याप्रसंगी 1 ऑगस्ट ते 31 जुलै दरम्यान. सातबारा दुरुस्ती, पोटखराब क्षेत्र लागवडीलायक करणे व महसुल वसुली, गोण खनीज वसुली, वनजमिनीचे दावे, ग्रामपंचायत व जि.प. निवडणुका, नेसरगीत आपत्ती,कोरोना लसीकरण, संजय गांधी निरोधार योजनचे पात्र लाभार्थी निवड, काल बाय नोंदी, तगाइ बंडीग, निस्तार पत्र आदी कामे उत्कृष्टरित्या केलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांना जिल्हाधिकारी मनिष खत्री, प्रांताधिकारी मिनल करनवाल, तहसिलदार मंदार कुलकर्णी, गटविकास अधिकारी सी.के.माळी, पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर, मुख्याधिकारी संपन्नी मुदलवाडकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र व फुलगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

यात सन्मान झालेले अधिकारी व कर्मचारी, महसुल नायब तहसिलदार सुरेखा जगताप, प्रताप मराठे, संतोष जाधव, गोपाल चौधरी, गणेश बेदरकर, रोहिणी वळवी, देविदास गावीत, सुकलाल गावीत, रविकिरण गांगुर्डे, पल्लवी कुलकर्णी, पोलिस पाटील कोलदा अभसिंग वसावे, पोलिस पाटील अनिल गावीत, शिपाई तहसिल कार्यालय रमेश वसावे, कोतवाल रमेश गावीत, कोतवाल सतिष नाईक, उर्मिला गावीत, अजित वळवी, परशराम कोकणी, तसेच पुरवठा विभागामार्फत रेशन दुकानदार यांना ओळख पत्र तसेच भाव फलक देण्यात आले. तसेच आधारकार्ड व मतदान कार्ड लिक करण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे.

त्यासाठी मतदार यांच्याकडुन फार्म 6 ब भरुन घेण्यासाठी बीएलओ यांना वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी मनिषा खत्री म्हणाल्या, महसुल विभागाची कामगिरी कौतुकास पात्र आहे. यात कोणतेही काम असो यात अतिवृष्टी, कोरोना महामारी या संकटात चांगले काम महसुल विभागाने केले आहे.

या कार्यक्रमाची प्रस्तावना तहसिलदार मंदार कुलकर्णी यांनी केली. सुञसंचलन नायब तहसिलदार जितेंद्र पाडवी व सुरेखा जगताप यांनी केले. आभार संजय गांधी निराधार योजनेचे नायबतहसिलदार दिलीप कुलकर्णी यांनी मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com