सात कोटीत उभी राहणार नंदुरबार पालिकेची इमारत

माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या पाठपुरावाच्या प्रयत्नांना यश
सात कोटीत उभी राहणार नंदुरबार पालिकेची इमारत

नंदुरबार । Nandurbar । प्रतिनिधी

नंदुरबार नगरपरिषदेच्या (Municipal Corporation) प्रशासकीय इमारतीच्या (building) बांधकामासाठी (constructed) राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने (Urban Development Department) वैशिष्ट्यपुर्ण योजनेतून सहा कोटी 67 लाख 87 हजार 954 रुपयांचा निधी (Funding) वितरीत करण्यास मंंजुरी देण्यात आली आहे. या इमारतीच्या प्रकल्पांंतर्गत सदर प्रकल्प खर्चाचा 90 टक्केे हिस्सा राज्य शासन व 10 टक्के हिस्सा नगरपरिषदेचा असणार आहेे. या निधीसाठी माजी आ.चंद्रकांत रघुवंशी (Former MLA Chandrakant Raghuvanshi) यांनी पाठपुरावा केल्याने त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

नंदुरबार नगरपालिकेच्या प्रशासकीय (Municipal Corporation) इमारतीचे सुसज्ज व भव्य दिव्य बांधकाम (constructed) करण्यात येत आहे. या पालिका प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी वैशिष्ट्यपुर्ण योजनेंंतर्गत 15 कोटी 19 लाख 86 हजार 616 रुपयांचा प्रस्ताव (Proposal) शासनाकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार शासन हिस्साची 6 कोटी 67 लाख 87 हजार 954 रुपयांची रक्कम इतका निधी राज्य शासनाच्या (government) नगरविकास विभागाने आज 4 मे 2022 रोजी मंजुरी देवुन सदरचा शासन निर्णय जारी केला आहे. त्यात काही अटी व शर्तीच्या अधीन राहुन हा निधी मंजुर करण्यात आला आहे.

सदर निधी मंंजुर करतांना प्रकल्पांतर्गत होणारी कामे ही सार्वजनिक मालकीच्या ठिकाणीच करावी. तसेच सर्वसमावेशक नागरीकांच्या सोयीसुविधांमध्ये भर पडणार आहे याची खात्री करावी, यासह काही महत्त्वाच्या जबाबदार्या जिल्हाधिकारी यांच्या असणार आहेत.

नंदुरबार नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीसाठी निधी देण्याचा शब्द मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे यांनी दिला होता. त्यानुसार राज्य शासनाने नंदुरबार पालिका इमारत बांधकामासाठी 6 कोटी 67 लाख 87 हजार 954 रुपयांचा निधी मंजुर केला आहेे. त्यामुळे नंंदनगरीकरांना दिलेला शब्द पुर्ण केला असून त्याबद्दल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे यांचे मनापासुुन आभार मानतो.

माजी आ.चंद्रकांत रघुवंशी

Related Stories

No stories found.