शोध सामर्थ्याचा ; आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात खान्देशचा डंका

शोध सामर्थ्याचा ; आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात खान्देशचा डंका

महेश पाटील

नंदुरबार - nandurbar

वैद्यकीय शिक्षण (Medical education) घेत असतांना नाटकांवर जडलेले प्रेम, त्यातच पु.ल.देशपांडे यांच्या एका वाक्याने प्रभावित होवून नंदुरबार येथील बालरोग तज्ञ डॉ.सुजित भरत पाटील यांनी वैद्याकीय व्यवसाय सांभाळत जनजागृतीसाठी लघु चित्रपटांची (Short film) निर्मिती केली. त्यांचे आनंदयात्री, काश व बटरफ्लाय या लघु चित्रपटांनी 10 देशांचा प्रवास करीत 100 पेक्षा अधिक पुरस्कार मिळवीत खांन्देशाचा डंका आंतरराष्ट्रीय स्तरावर बजावला आहे. त्यांनी तीन देशातील आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये ज्युरी म्हणून कामही पाहिले आहे.

शोध सामर्थ्याचा ; आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात खान्देशचा डंका
Video वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड ; नंदुरबारचा ‘घुमर’ महोत्सव

जळगाव (jalgaon) जिल्हयातील चोपडा (chopada) तालुक्यातील दोंदवाडे येथील मुळ रहिवासी व जन्मापासून नंदुरबार तालुक्यातील खोंडामळी येथील रहिवासी व सध्या नंदुरबार शहरात बालरोग तज्ञ असलेले डॉ.सुजित भरत पाटील यांचे प्राथमिक शिक्षण नंदुरबार शहरातील प्यारीबाई ओसवाल प्राथमिक विद्यालय, माध्यमिक शिक्षण श्रीमती हि.गो.श्रॉफ हायस्कुलमध्ये झाले. त्यांनतर त्यांनी अकरावी व बारावीपर्यंतचे नंदुरबार येथील जी.टी.पी.महाविद्यालयात घेतले.

शोध सामर्थ्याचा ; आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात खान्देशचा डंका
Video वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड ; नंदुरबारचा ‘घुमर’ महोत्सव

त्यानंतर एम.बी.बीएस.साठी त्यांची सांगली येथे निवड झाली. सांगलीला नाटय पंढरी म्हणतात. विष्णूदास भावे यांनी याच ठिकाणाहून नाटकांना सुरूवात केली. त्याठिकाणी विद्यालयात दरवर्षी दोन दिवशीय वार्षिक संमेलने भरत असत. तेथे एक दिवस नाटक तर एक दिवस इतर कार्यक्रम व्हायचे. त्याठिकाणी डॉ.सुजित पाटील यांना नाटकाची आवड निर्माण झाली. तेथे त्यांना ड्रामा सेक्रेटरी नेमण्यात आले. त्यामुळे ते नाटकेही बसवू लागले. त्यातच त्यांना उत्कृष्ट कलाकाराचा पुरस्कार मिळाला.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुणे येथ्ील ससून रूग्णालयात त्यांनी वैद्यकीय नोकरीला प्रारंभ केला. तेथेही नाटके पाहणे सुरु होते. 2009 ते 2016 पर्यंत ते पुण्यात होते. त्यानंतर ते नंदुरबार येथे वैद्यकीय व्यवसायासाठी परतले. याठिकाणी तीन ते चार वर्षापर्यंत नाटकांशी त्यांचा संपर्क तुटला. मात्र, नंदुरबार येथील खुशालसिंग राजपूत यांच्या लघुचित्रपटात डॉ.सुजीत पाटील यांना मुख्य अभिनेत्याची भुमिका साकारायला मिळाली. त्या लघु चित्रपटाला राज्यात तिसरा क्रमांक मिळाला.

वैद्यकीय शिक्षण घेत असतांना नाटकाचा लागलेला छंद व आयुष्यात भावलेलं एक गुपित ते सांगतात, उपजिविकेसाठीआवश्यक असणार्‍या विषयाच शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीने करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे शिकवेल, हे पु.ल.देशपांडे यांच्या या वाक्याने त्यांच्यावर विशेष प्रभाव टाकला. त्यानंतर त्यांनी आनंदयात्री, काश, बटर फ्लाय या हिंदी लघु चित्रपटांची निर्मिती केली.

तसेच सलाम इंडीया, हम होंगे कामयाब हे जनजागृतीपर गाणे कोविडच्या काळात तयार केले. त्यांनी निर्मित केलेले आनंद यात्री, काश, बटर फ्लाय या हिंदी लघु चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून साथ दिली. त्यामुळेच या तीन लघु चित्रपटांनी इंग्लंड, अमेरीका, दक्षिण कोरीया, दक्षिण अमेरीका, स्विडन, रोम, इटली, पोर्तुगाल, भारत या 10 देशांवर छाप सोडत आंतरराष्ट्रीय शॉट महोत्सवात दाखल झाला. तब्बल 100 पेक्षा अधिक पुरस्कार प्राप्त केले आहे.

यात त्यांना नंदुरबार येथील डॉक्टर्स यांचे सहकार्य मिळाले. सर्व मिळून निधी जमा करून जनजागृतीपर लघु चित्रपटाची निर्मिती डॉ.सुजित पाटील करीत असतात. लवकरच ते नंदुरबारवर आधारीत वेब सिरीजची निर्मिती करणार आहे.

लघु चित्रपटाच्या निर्मिती सोबतच डॉ.सुजित पाटील यांना इराण, साऊथ कोरीया व भारतात आंतरराष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सवात जुरी म्हणूनही संधी प्राप्त झाली. नंदुरबार येथील डॉ.सुजित पाटील यांनी वैद्यकीय व्यवसाय सांभाळत असतांना जनजागृतीसाठी निर्मित केलेले लघु चित्रपट यांची दखल घेण्यासारखी आहे.

शोध सामर्थ्याचा ; आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात खान्देशचा डंका
Video वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड ; नंदुरबारचा ‘घुमर’ महोत्सव
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com