उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार जिल्हा ठरला सर्वात ’हॉट’

 उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार जिल्हा ठरला सर्वात ’हॉट’

नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR

यंदाच्या उन्हाळ्यातील (summer) सर्वोच्च तापमानाची (highest temperature) गुरुवारी नोंद करण्यात आली. दिवसभरात तब्बल ४५.२ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आल्याची माहिती कृषी विज्ञान केंद्राच्या (Agricultural Science Center) हवामान केंद्रातर्फे (Weather station) दिली आहे. दरम्यान, काल दि.२७ एप्रिल रोजी नंदुरबारात ४४.३ अंश सेल्सीअस तापमानाची नोंद करण्यात आली होती.

नंदुरबार जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून तापमानाचा पारा (Temperature mercury) वाढत चालला आहे. यंदा मार्चपासूनच तापमानाच्या पार्‍याने चाळीशी पार केली आहे. गेल्या तीन दिवसांपासून ४२.३ अंश सेल्सिअस (42.3 degrees Celsius) तापमानाची नोंद करण्यात आली होती.

आज दि. २८ रोजी तब्बल ४५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. जिल्हयात सन १९५८ मध्ये एप्रिल महिन्यात ४५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. आज दि.२८ एप्रिल रोजी ४५.२ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आल्याचे कोळदा कृषी विज्ञान केंद्राचे (Agricultural Science Center) कृषी हवामान शास्त्रज्ञ सचिन फड यांनी सांगितले.

दरम्यान, वाढत्या उष्णतेने जनजीवन विस्कळीत (Disruption of public life) झाले आहे. मुख्य चौक आणि रस्त्यावर शुकशुकाट दिसून आला. आणखी काही दिवस तापमान कायम राहणार असून अजून तापमान अजून वाढण्याची शक्यता असल्याचे कृषी हवामान केंद्रातर्फे सांगण्यात आले. शेतकर्‍यांनी स्वतःची व पशुधनाची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.