नंदुरबार : मद्यपी वाहन चालकाविरुध्द् 141 गुन्हे दाखल

नंदुरबार : मद्यपी वाहन चालकाविरुध्द् 141 गुन्हे दाखल

नंदुरबार । nandurbar। प्रतिनिधी

नंदुरबार जिल्ह्यात 30 ते 31 डिसेंबर दरम्यान जिल्हा पोलीसांतर्फे (District Police) विशेष मोहिम राबविण्यात आली असुन पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या आदेशान्वाये मद्यपी वाहन चालकाविरुध्द् (Drunk Driver) दोन दिवसांत 141 गुन्हे दाखल (Crimes filed) करण्यात आले आहे.

नवीन वर्षाच्या स्वागताच्या उत्साहादरम्यान काही अति उत्साही नागरिक सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करुन शांतता भंग करतात. तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणतात. अशा इसमांविरुध्द् तसेच दारु पिऊन वाहन चालविणार्‍यांविरोधात 30 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत विशेष मोहिम राबवून कारवाई करण्या बाबत नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी संपूर्ण जिल्हयातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते.त्या अनुषंगाने संपुर्ण नंदुरबार जिल्हयात दोन दिवसात नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत ठिक-ठिकाणी नाकाबंदी करुन दुचाकी, चारचाकी व इतर वाहनांची तपासणी करण्यात आली.

नाकाबंदी दरम्यान 141 वाहन चालकांनी मद्यप्राशन केलेले असल्याचे आढळुन आले. त्यामुळे त्यांचे विरुध्द् नंदुरबार शहर पोलीस ठाणे- 5, उपनगर पोलीस ठाणे-23, नंदुरबार तालुका पोलीस ठाणे- 8, नवापूर पोलीस ठाणे- 14, विसरवाडी पोलीस ठाणे-10, धडगांव पोलीस ठाणे- 5, म्हसावद पोलीस ठाणे- 5, सारंगखेडा पोलीस ठाणे-6, अक्कलकुवा पोलीस ठाणे- 11, तळोदा पोलीस ठाणे- 8, मोलगी पोलीस ठाणे-3 व शहर वाहतूक शाखा 24 गुन्हे असे एकुण 141 गुन्हे संबंधीत पोलीस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आले.दरम्यान दारु पिऊन वाहन चालविणार्‍यांविरुध्द् राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत दारु पिऊन वाहन चालवितांना आढळून आलेल्या वाहन चालकांचे परवाने (लायसन्स) निलंबन करण्याचे प्रस्ताव उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदुरबार यांचे कार्यालयात पाठविण्यात येणार असुन लवकरच त्यांचेवर परवाने (लायसन्स) निलंबनाची कारवाई करण्यात येईल.

नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून माहे जानेवारी 2022 ते डिसेंबर 2022 या एक वर्षाच्या कालावधीत नंदुरबार जिल्ह्यात दारु पिऊन वाहन चालवितांना आढळून आलेल्या 391 वाहन चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले असून 358 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com