जिल्हयात वेगवेगळया घटनेत दोघा युवकांचा खून

उमज येथे नाचतांना धक्का लागल्याच्या कारणावरून हाणामारीत युवकाचा मृत्यू, दोजापाणी येथील युवकाचा गळा दाबून खून
जिल्हयात वेगवेगळया घटनेत दोघा युवकांचा खून

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

जिल्हयात दोन वेगवेगळया घटने दोन युवकांचा(youths) खून (Murder) झाल्याच्या घटना घडल्या. याबाबत संबंधीत पोलीस ठाण्यांमध्ये (Police stations) गुन्हे दाखल (Crime filed) करण्यात आले आहेत.

मोठे उमज

तालुक्यातील मोठे उमज येथे लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमात नाचतांना धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या हाणामारीत २५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार तालुक्यातील मोठे उमज गावात सचिन यशवंत वळवी यांच्या घरासमोर अंगणात टाकलेल्या मंडपात लग्नाच्या हळदीचा कार्यक्रम दि.२८ रोजी रात्री होता.

यावेळी लग्न मंडपात नाचतांना धक्का लागल्याच्या कारणावरुन वाद झाल्याने मायकल राजु वळवी, अंगत उर्फ हंगार्‍या कृष्णा वळवी, राज मंगलसिंग वळवी, चंद्रसिंग गोपीचंद गावीत, फुलसिंग कांतीलाल गावीत, विधीसंघर्ष बालक या सहा जणांनी इझाक उर्फ मुंडा मजनू वळवी ( वय २५ ) रा.मोठे उमज, ता.नंदुरबार या युवकाला हाताबुक्क्यांनी छातीवर, पोटात व लाथांनी पाठीवर जबर मारहाण केली.

तसेच त्याच्या अंगावर कुदून बसत मारहाण केल्याने इझाक उर्फ मुंडा मजनु वळवी या युवकास जिवेठार केले. ही घटना दि २९ डिसेंबरच्या रात्री २.१५ वाजेदरम्यान घडली. याबाबत योसेफ मजनु वळवी यांनी नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार मायकल राजु वळवी, अंगत उर्फ हंगार्‍या कृष्णा वळवी, राज मंगलसिंग वळवी, चंद्रसिंग गोपीचंद गावीत, फुलसिंग कांतीलाल गावीत, शितीज रोशन वळवी यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३०२, १४३, १४७, १४९, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत राठोड करीत आहेत.

दोजापाणी येथील १८ वर्षीय युवकाचा गळा दाबुन खून

तळोदा तालुक्यातील चौगाव, रापापूर शिवारात अज्ञात व्यक्तीने गळा दाबुन दोजापाणी येथील १८ वर्षीय युवकाचा खून केल्याची घटना घडली. युवकाचा खून झाल्याचे शवविच्छेदनाच्या अहवालातून उघडकीस आले आहे. याप्रकरणी अनोळखीविरुध्द तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तळोदा तालुक्यातील रेवानगर गावाच्या पुढे चौगांव शिवार व रापापूर रस्त्याच्या बाजुला शेतामध्ये विपुल टेट्या पावरा ( वय १८ ) रा.दोजापाणी, ता.तळोदा या युवकाचा दि. २२ व २३ डिसेंबर दरम्यान मृतदेह आढळून आला होता.

तळोदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद होवून मयत युवकावर शवविच्छेदन तळोदा उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आला. या शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात गळा दाबल्याने युवकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

विपुल टेट्या पावरा या युवकाचा अनोळखी व्यक्तीने अनोळखी कारणासाठी गळा दाबुन खून केला आहे. याबाबत टेट्या वनकर पावरा रा.रा.दोजापाणी, ता.तळोदा यांच्या फिर्यादीवरून तळोदा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुध्द भादंवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल करीत आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com