जमिनीवर आपटत एकाचा खून

नरडाणा पोलिसात तिघांवर गुन्हा दाखल
जमिनीवर आपटत एकाचा खून

सोनगीर | Songir

शिंदखेडा तालुक्यातील वर्षी येथे क्षुल्लक कारणावरून जमिनीवर आपटत Hitting the ground एकाचा खून करण्यात आला. काल सायंकाळी ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी नरडाणा पोलिसात तिघांवर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.

याबाबत युवराज मंडाले यांनी फिर्याद दिली आहे. संजय निंबा कोळी (रा. कोळी गल्ली, वर्षी ता. शिंदखेडा) असे मयताचे नाव आहे. त्याची पुतणी लिना हिने काकडी विकल्याचे पैसे का दिले नाही, असा जाब विचारल्याचा राग येवून काल सायंकाळी सहा ते सव्वा सहा वाजेच्या सुमारास युवराज लक्ष्मण मंडाले व त्याचा चुलत भाऊ मयत संजय कोळी यांना प्रकाश भिमराव पांचाळ, विशाल साहेबराव पांचाळ व मुकेश शाम पांचाळ सर्व (रा. खालची भिलाटी, वर्षी) यांनी शिवीगाळ करत धक्काबुक्की केली.

तेव्हा संजय कोळी त्यांना बोलण्यास गेला. त्यादरम्यान प्रकाश पांचाळ हा लोखंडी पास घेवून अंगावर धावून गेला. तर मुकेश पांचाळ याने संजय कोळी याचे दोन्ही हात धरून उचलून जमिनीवर आपटले. त्यानुसार वरील तिघांवर नरडाणा पोलिसात भांदवि कलम ३०२, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने, शिरपूर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रविंद्र देशमुख, नरडाणा पोलिस ठाण्याचे सपोनि मनोज ठाकरे, थाळनेर पोलिस ठाण्याचे सपोनि उमेश बोरसे यांनी घटनास्थळी भेट दिली.

Related Stories

No stories found.