शनिमांडळ येथील २९ वर्षीय युवकाचा खून

पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला
शनिमांडळ येथील २९ वर्षीय युवकाचा खून

नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR

तालुक्यातील शनिमांडळ येथील २९ वर्षीय युवकाचा खून करून वैंदाणे ते मालपूर रस्त्यावरील विहीरीत मृतदेह फेकल्याची घटना घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अज्ञात इसमाविरूध्द नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ येथील संजय राजेंद्र मोरे (पाटील) (२९) या युवकाचा अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणाने खून केला.

तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्येशाने संजय राजेंद्र मोरे याचा मृतदेह एका कापडी चादरीमध्ये नग्न अवस्थेत बांधून वैंदाणे ते मालपूर डांबरी रस्त्यालगत असलेल्या राखीव वनक्षेत्र कक्ष क्र. ४३७ मधील पुरातन विहिरीत फेकून दिला.

हा खून का करण्यात आला याचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे. याप्रकरणी पोना ज्ञानेश्‍वर सामुद्रे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरूध्द नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात भादवि कलम ३०२, २०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोसई कमलाकर चौधरी करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com