चार्तुमासानिमित्ताने तेरापंथ जैन धर्माचे मुनीश्री मुनी सुव्रतकुमारजी यांचे शहादा नगरीत आगमन

चार्तुमासानिमित्ताने तेरापंथ जैन धर्माचे मुनीश्री मुनी सुव्रतकुमारजी यांचे शहादा नगरीत आगमन

शहादा | ता.प्र.- SHAHADA

चातुर्मासानिमित्त (Chartumas) आचार्य श्री महाश्रमणजी यांच्या आज्ञानुवर्ती मुनीश्री सुव्रतकुमारजी (Munishri Muni Suvrat Kumarji), मुनीश्री मंगलप्रकाशजी, मुनीश्री शुभमकुमारजी यांचे गुजरात राज्यातून शहादा येथील श्रीराम कॉलनीतील डॉ.बी.डी.जैन यांच्या राहत्या घरी आगमन (arrives) झाले आहे.

मुनीश्री मुनी सुव्रतकुमारजी यांचे सन २०२२ चे जैन धर्मीयांचे चार्तुमासानिमित्ताने तेरापंथी भवनात (Terapanthi Bhavan) मंगल प्रवेश ३ जुलै रोजी सकाळी ८ वाजता होणार आहेत.

आचार्य श्री महाश्रमणजी यांच्या आज्ञानुवर्ती मुनीश्री मुनी सुव्रतकुमारजी आध्यात्मिक व धर्म प्राचार करीत शहरालगत गावोगावी जावून त्यातील लोकांना नशामुक्त कसे होतील सौहार्द प्रेमभावना लोकांमध्ये कशी निर्माण होईल याचा प्रचार-प्रसार करणार आहेत.

शहादा परिसरात नशामुक्तीचे अभियानदेखील (De-addiction campaign) चालविणार आहेत. यापूर्वीही त्यांच्या प्रेरणेने अनेक लोक नशामुक्त झाले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com