सौ.प्रगती पाटील यांची मेकअप आर्टीस्ट म्हणून गिनीज बुकात नोंद

सौ.प्रगती पाटील यांची मेकअप आर्टीस्ट म्हणून गिनीज बुकात नोंद

खेतिया - Khetiya - वार्ताहर :

नंदुरबार येथील पलक ब्युटी आणि मेकअप स्टुडिओच्या संचालिका सौ.प्रगती जवेश पाटील यांनी इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट इव्हेंट्स मध्ये भारतीय पारंपारिक शैलीमध्ये नवरी/मॉडेलचा मेकअप पूर्ण करून अंतिम चरणात फेस मेकअप पूर्ण केल्याने त्यांची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये मेकअप आर्टिस्ट म्हणून नोंद करण्यात आली.

मोस्ट युझर्स इन अ मेकअप विडिओ हँगआऊट या नावाने इंटरनॅशनल ब्युटी सलून ट्रेड शो (बीईएएसए), ऑल इंडिया हेअर अँड ब्युटी असोसिएशन (एआईएचबीए) आणि ब्राह्मणी इव्हेंटस अँड एक्स्झीबिशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट इव्हेंट ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात आला होता.

या इव्हेंटची संपूर्ण मॉनिटरिंग गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची टीम लंडन येथून करण्यात आली. यात भारत, अमेरिका, दुबई, ब्रिटेन, लंदन आदी ठिकाणाहुन मेकअप आर्टिस्टांनी सहभाग घेतला होता.

या इव्हेंटमध्ये देश विदेशातून जवळपास 1146 मेकअप आर्टिस्टांनी सहभाग घेतला होता. नंदुरबार येथील पलक ब्युटी आणि मेकअप स्टुडिओच्या संचालिका सौ.प्रगती जवेश पाटील यांनी या इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट इव्हेंट्समध्ये भारतीय पारंपारिक शैलीमध्ये नवरी/मॉडेलचा मेकअप पूर्ण करून अंतिम चरणात फेस मेकअप पूर्ण करून त्यांची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये मेकअप आर्टिस्ट म्हणून नोंद करण्यात आली.

प्रगती पाटील यांनी सांगितले की, त्यांना बालपणापासूनच कलेची व मेकअपची आवड होती. सौ.नेहा पारेख यांच्या मार्गदर्शनाखाली ब्युटीपार्लरचा कोर्स पुर्ण केला तसेच मुंबई येथील असोसिएशन ऑफ ब्युटी थेरपी अँड कॉस्मेटोलॉजी इंडिया येथून ही कोर्स केला आहे.

सोबतच भारतातील प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट सौ. रिचा दवे यांच्याकडून मेकअप विषयी विशेष प्रशिक्षण घेतले असून मेकअप बद्दल नवनवीन सखोल माहिती घेऊन कार्य करीत आहे. त्या औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय शहादा येथील प्रा.डॉ.जवेश पाटील यांच्या पत्नी आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com