खासदार हिना गावित म्हणतात... आ.पाडवींना कार्यक्रमाला सन्मानाने बोलावले होते

ठेकेदाराचे हातपाय तोडण्याची भाषा करणे ही राजकारणाची संस्कृती नाही
खासदार हिना गावित म्हणतात... आ.पाडवींना कार्यक्रमाला सन्मानाने बोलावले होते

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

सेंट्रल रोड अँड इंन्फ्रास्ट्रक्चर फंड (Central Road and Infrastructure Fund) अर्थात सीआरआयएफ योजनेतून सोमावल-नर्मदानगर या सहा किमीच्या रस्त्याचे (road) भुमिपूजन (Bhumipujan) आज करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आ.राजेश पाडवी यांना देण्यात आले होते. यासाठी काल आ.पाडवी यांना संपर्क करण्यात आला होता. परंतू त्यांच्या स्विय सहाय्यकांनी (self helpers) माझ्या स्विय सहाय्यकाशी अत्यंत शिवराळ भाषेत बोलून ठेकेदाराचे (contractor's) हातपाय (arms and legs) तोडण्याची (breaking) भाषा (language) केली. ही बाब अत्यंत अशोभनीय असून ही आपल्या जिल्हयाची राजकीय संस्कृती (Political culture) नाही, अशी प्रतिक्रिया खा.डॉ.हीना गावित (MP Hina Gavit) यांनी ‘देशदूत’शी बोलतांना दिली.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री ना.नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) यांनी सोमावल-नर्मदानगर हा सहा किमीचा रस्ता सीआरआयएफ योजनेतून मंजूर केला आहे. या कामाचे भुमिपूजन आज करण्यात येणार होते.

मात्र, सदर कामाचा निधी मंजूर केल्याच्या कारणावरुन आ.राजेश पाडवी आणि खा.डॉ.हीना गावित यांच्यात श्रेयवाद सुरु झाला. खा.डॉ.हीना गावित (MP Hina Gavit) आपल्याला डावलून या रस्त्याच्या भुमिपूजनाचा कार्यक्रम घेत असल्याचा आरोप करत हा कार्यक्रम होवू देणार नाही, असा इशारा आ.पाडवी यांनी दिला होता.

मात्र, बांधकाम विभागाच्या (Construction Department) अधिकार्‍यांनी मध्यस्थी करत दोघा लोकप्रतिनिधींच्या हस्ते करण्याचा मार्ग काढला. त्यामुळे दुपारी २ वाजता आ.राजेश पाडवी यांनी सोमावल येथे या कामाचे भुमिपूजन (Bhumipujan) केले तर सायंकाळी खा.डॉ.हीना गावित यांनी नर्मदानगर येथे भुमिपूजन केले. या प्रकारामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

भुमिपूजनानंतर खा.डॉ.हीना गावित ‘देशदूत’शी बोलतांना म्हणाल्या, केंद्राने मंजूर केलेल्या रस्त्याच्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रश्‍नच येत नाही. आम्ही दोन्ही भाजपाचे (BJP') लोकप्रतिनिधी (people's representative) आहोत. या कामाच्या भुमिपूजनाच्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी कंाल माझ्या स्विय सहाय्यकाने आ.पाडवी यांच्या स्विय सहाय्यकाला फोन करुन कार्यक्रमाची कल्पना दिली होती.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आ.पाडवी (MLA Padvi) यांना सन्मानाने देण्यात येणार होते. परंतू त्यांना रस्ता मंजूर आहे, हेच माहिती नव्हते. त्यामुळे त्यांनी रस्त्याची पूर्ण माहिती घेतली त्यानंतर त्यांच्या स्विय सहाय्यकाने माझ्या स्विय सहाय्यकाला अत्यंत शिवराळ भाषेत संभाषण केले.

तसेच ठेकेदाराच्या तंगडया तोडण्याची (breaking) भाषा करुन पक्षात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हे कदापीही सहन केले जाणार नाही. असा प्रकार नंदुरबारच्या इतिहासात कधीच झालेला नाही, कारण ही आपली राजकीय संस्कृती (Political culture) नाही.

एका लोकप्रतिनिधीच्या त्याही महिला लोकप्रतिनिधीच्या स्विय सहाय्यकाशी अशी भाषा करणे हे स्विय सहाय्यकाला तसेच आमदारालाही शोभत नही. म्हणून आ.पाडवी यांनी याप्रकरणी माफी मागावी, असे खा.डॉ.गावित म्हणाल्या.

खा.डॉ.गावित पुढे म्हणाल्या, या रस्त्याच्या मंजूरीसाठी आ.पाडवी (MLA Padvi) किती वेळा दिल्लीला गेले होते, हे त्यांना विचारा. मी या कामासाठी दहा टेबलावर फिरुन त्याला मंजूरी मिळवली आहे. जिल्हयातील चार ठिकाणी हा रस्ता मंजूर झाला आहे.

आजच नवापूर येथे एका कामाचे भुमिपूजन केले, त्या कार्यक्रमाला तेथील कॉंंग्रेसचे आ.शिरीषकुमार नाईक (Congress MLA Shirish Kumar Naik) यांना मी आमंत्रीत केले होते. कॉंग्रेसच्या आमदाराला बोलवू शकते तर आ.पाडवी तर भाजपाचेच आहेत त्यांना डावलणे शक्यच नाही.

यापुर्वीदेखील तीन रस्ते मी मंजूर करुन आणले आहेत. आ.पाडवी यांनी राज्यातून किती रस्ते मंजूर करुन आणले ते आधी सांगावे मग या रस्त्याचे श्रेय घ्यावे, असेही खा.डॉ.गावित यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com