इंधन दरवाढीच्या निषेधार्त युवासेनेतर्फे आंदोलन

बैलगाडीवर गॅस ठेवत केंद्र सरकारचा निषेध,नवापूर, तळोदा,अक्कलकुवा येथे सायकल रॅली
 इंधन दरवाढीच्या निषेधार्त युवासेनेतर्फे आंदोलन

नंदुरबार । Nandurbar। प्रतिनिधी

पेट्रोल (Petrol) डिझेलचे (Diesel) अवास्तव दरवाढ (Price increase) हेच का अच्छे दिन (Good day) असा संतप्त सवाल करीत युवा सेनेच्यावतीने (Yuvasena) नंदुरबार जिल्ह्यात बैलगाडीवर गॅस (Gas on a bullock cart) ठेऊन, सायकल रॅली (Bicycle rally) काढुन आंदोलन केले.यावेळी केंद्र सरकारचा (Central Government) निषेध (Prohibition) करण्यात आला.

अक्कलकुवा
अक्कलकुवा
नवापूर
नवापूर
तळोदा
तळोदा

केंद्र सरकारतर्फे दिवसेंदिवस पेट्रोल व डिझेलची दरवाढ केली जात आहे. सर्वसामान्य जनता कोरोना, दुष्काळाच्या संकटामुळे आर्थिक संकटात असताना सततच्या होणार्‍या पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे जीवनमान विस्कळीत झालेले आहे. युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे व सचिव वरून देसाई यांच्या आदेशान्वये आज शहरात युवासेनेच्या पदाधिकार्‍यांच्यावतीने पेट्रोल डिझेल दरवाढ व महागाईच्या विरोधात केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी बैलगाडीसह सायकल रॅली काढून आंदोलन करण्यात आले.

सकाळी 11 वाजता मंगळ बाजारातील पेट्रोल पंपापासून रॅलीला सुरुवात झाली. रॅलीच्या अग्रभागी बैलगाड्यावर गॅस सिलेंडर ठेवत युवा शिवसैनिकांनी सायकल रॅली शहरातून विविध भागात मिरवली. नेहरू पुतळ्याजवळ रॅली आल्यानंतर या ठिकाणी घोषणाबाजी करण्यात आली. रॅलीमध्ये युवासेना जिल्हाधिकारी अर्जुन मराठे, जिल्हा उपप्रमुख सोनू भैय्या, माजी नगरसेवक अर्जुन मराठे, युवती सेना जिल्हाधिकारी मालती वळवी, युवासेना तालुका अधिकारी समाधान पाटील, युवा सेना शहर आधिकारी दादा कोळी,युवती सेना अधिकारी काजल मच्छले, दिनेश भोपे, घारु कोळी, लखन माळी, आनंदा पाटील, प्रफुल खैरनार, दिग्विजय पाटील, गोविंदा चौधरी, सुरज मराठे आदींनी सहभाग घेतला

अक्कलकुवा येथे सायकल रॅली

खापर - वार्ताहर

केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी राज्याचे पर्यटनमंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखालीयुवा सेनेच्यावतीने राज्यव्यापी सायकल रॅली आयोजनाचे आव्हान करण्यात आले होते.यानुसार अक्कलकुवा येथे युवासेनाच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सायकल रॅली काढण्यात आली. काही महिन्यांपासून पेट्रोल, डिझेल,गॅस सिलेंडरचे दर गगनाला भिडले आहे. यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे,केंद्रातील मोदी सरकार जनहित विरोधी धोरण याला कारणीभूत असल्याचे म्हणत आज युवासेनेच्या वतीने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा युवा समन्वयक रोहित चौधरी,युवासेना जिल्हाप्रमुख ललित जाट यांच्या नेतृत्वात अक्कलकुवा येथे इंधन दरवाढीविरोधात सायकल रॅली काढून आंदोलन करण्यात आले.यावेळी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली,

अक्कलकुवा शिवसेना संपर्क कार्यालय पासून रॅलीला सुरुवात करत बस स्टॅड,मेन रोड,मुख्य बाजारपेठ ते झेंडा चौक,तळोदा नाका या मार्गाने घोषणा देत सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी,जिल्हा संघटक लक्ष्मण वाडीले,जिल्हा युवा समन्वयक रोहित चौधरी, युवासेना जिल्हाप्रमुख ललित जाट,पृथ्वीसिंग पाडवी,छोटू हाश्मी,किरण भावसार,छोटू पाडवी,दिपक मराठे,जितू लोहार, जिग्नेश सोनार,नटवर पाडवी, नंदलाल चौधरी,गोलू चंदेल,पारस सोलंकी,राजू टाक,जमील शेख, विपुल शिंपी,पार्थ लोहार,सौरभ सोनार,भीमादादा सह शिवसेना युवासेना पदाधिकारी व शिवसैनिक आदी उपस्थित होते.

नवापूर येथे इंधन गँस दरवाढीचा निषेध

नवापूर। श.प्र.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा आदेशाने व युवासेना सचिव वरुन सरदेसाई यांचा नेतृत्वाखाली नवापूर शहरात युवासेनेतर्फे तथा शिवसेना जिल्हाउप्रमुख हंसमुख पाटील यांचा मार्गदर्शनाखाली इंधन गँस दरवाढ संदर्भात राज्यव्यापी सायकल रॅली आंदोलन काढण्यात आली.

नवापूर युवासेना तर्फे महात्मा गांधी पुळया पासुन सुरुवात करण्यात आली सायकल रॅली लाईट बाजार,मेनरोड,मार्गाने महामान डॉ बाबासाहेब आंबेडकर पुळयाला पुष्पहार अर्पन करुन सायकल रँलीची सांगता करण्यात यावेळी युवासेनेचे उपजिल्हा अधिकारी दिनेश भोई,तालुका प्रमुख नरेंद्र गावीत,शहर अधिकारी राहुल टिभे,युवासेनेचे माजी उपजिल्हाधिकारी मनोज बोरसे,किशन सिरसाठ,मयुर पाटील,हर्षल माळी,भटु पाटील,रामु पवार,भरत माञे,दादु भोई,कमलेश गोसावी,युवराज पाडवी,बंटी पाटील,युवती सेना तालुका प्रमुख मनिषा नाईक,दिपीका नाईक,पुनम नाईक,कार्तीक ढोले,विशाल वळवी,करण गावीत,मनिष पाडवी,अजय पाडवी,सोम पाडवी सह असंख्य युवासेनेचे पदधिकारी उपस्थित होते.कुठलाही अमुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांचा मार्गदर्शनाखाली सहय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ उपनिरीक्षक अशोक मोकळ,पो हे को.निजाम पाडवी,दादाभाई वाघ,युवराज परदेशी,जगदीश सोनवणे विक्की वाघ,नामदेव राठोड,अलोक नरवाडे आदींनी चोक बंदोबस्त ठेवला

तळोदा येथे केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी

मोदलपाडा ता.तळोदा वार्ताहर

पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस सिलेंडर भाव वाढ संदर्भात केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी तळोदा शहर युवासेना व शिवसेनेच्या वतीने सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी इंधन दरवाढीचा निषेध करत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी युवासेना शहर अध्यक्ष जगदीश चौधरी, युवा सेना तालुका अध्यक्ष कल्पेश सुर्यवंशी, शिवसेना शहर प्रमुख जितेंद्र दुबे, संजय पटेल,आनंद सोनार, विपुल कुलकर्णी, जयेश सूर्यवंशी, श्रावण तिजविज, विजय मराठे ,नीतू सोनार, आदी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मोदी सरकारचा निषेध हेच का अच्छे दिन असा सवाल करत तळोदा शहर युवासेनेतर्फे इंधन दरवाढी विरोधात निषेध नोंदवण्यात आला. अच्छे दिनचा नारा देऊन केंद्रात विराजमान झालेल्या मोदी सरकारने दीपावलीच्या तोंडावर जनतेला महागाईच्या दरीत लोटून अधिक संकटात टाकले असल्याचा आरोप देखील यावेळी निषेध कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. संपूर्ण जनतेच्या मनातील आक्रोश केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याकरिता शिवसेनेतर्फे सायकल रॅली काढून निषेध करत व काळे पट्टी बांधून सायकल रॅली काढण्यात आली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com