बिबटया दिसल्याने तरुणांची मोटरसायकल स्लीप

दोघे जखमी, मोरवड येथील घटना, नागरिकांमध्ये दहशत
बिबटया दिसल्याने तरुणांची मोटरसायकल स्लीप

बोरद । Board वार्ताहर-

तळोदा तालुक्यातील मोरवड (Morwad) येथील युवक (Youth) धानोरा येथील बहिणीला (Sister) भेटण्यासाठी जात असतांना त्यांना बिबट्या (Leopards) दिसल्याने जीव वाचविण्यासाठी दुचाकी घेऊन पळत असतांना दुचाकी स्लिप (Bike slip) झाल्याने भयभीत झालेले दोन युवक जखमी (Injured) झाल्याची घटना घडली.

मोरवड-धानोरा रस्त्यावर संध्याकाळी 7:30 ते 8 च्या दरम्यान धानोरा येथे दुचाकीवरून जाणार्‍या दगा लिंबा पाटिल व राहुल नरोत्तम पाटील यांना अचानक डोळ्यासमोर बिबट्याचे दर्शन झाले. अंधार्‍या रात्री चक्क काळोखात बिबट्याचे डोळे चमकले आणि दुचाकीच्या लाईटच्या प्रकाशात बिबट्याच्या अंगावरील पट्टे दिसून आले. त्यामुळे भयभित झालेल्या तरुणांनी जोरात मोटरसायकल चालविली. आपल्या मागे बिबट्या पाठलाग करत तर नाही ना, या भितीने त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि मोटरसायकल एका खड्डयात आदळून पडली. या अपघातात दोन्ही तरुण जखमी झाले.

हा थरार संध्याकाळी 7:30 ते 8 च्या दरम्यान घडला. जखमी रुग्णांना तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. संबंधित युवकांना कमी प्रमाणात दुखापत असल्याने त्यांची प्रकृती चांगली असल्याचे कळते. संबंधित युवकांना भयभीत झालेले बघून, परिसरातील लोकांमध्ये व शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सदर घटना वनविभागाला कळताच वनक्षेत्रपाल निलेश रोडे, वासुदेव माळी, विरसिंग पावरा, विजय पाटील, आर.जे.शिरसाठ, ज्योती खूपे कर्मचारी घटनास्थळी पोहचून पंचनामा करुन उपाययोजना करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com