सातपुड्यात मोहफुलांचा हंगाम सुरु, आदिवासींना मिळतोय रोजगार

सातपुड्यात मोहफुलांचा हंगाम सुरु, आदिवासींना मिळतोय रोजगार

रविंद्र वळवी

मोलगी । Molgi

सातपुड्यातील (Satpuda) कल्पवृक्ष म्हणून सुपरिचित असलेल्या मनमोहक मोहाच्या फुलांचा हंगाम (Mohphulan season) सुरु झाला आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यात आदिवासींना (tribals) रोजगार (employment) उपलब्ध झाला आहे. सध्या बाजारात मोहाचे फुले विक्रीला आले असून 50 ते 60 रुपये दराने व्यापारी खरेदी (Merchant shopping) करत आहेत.

सातपुड्यात (Satpuda) अनेक औषधी वनस्पती (Herbs) आहेत. मोहाच्या फुलांचादेखील ((Mohphulan) आयुर्वेदिक औषधी म्हणून वापर होतो. तालुक्यात मोहाचे अनेक वृक्ष आढळून येतात. साधारणतः चैत्र पौर्णिमेपासून मोहाची झाडे फुलं, फळांनी बहरतात व पुढे पंधरा ते वीस दिवस हंगाम (season) सुरु राहून झाडांना फुले उमलतात. मोह हा पानगळती प्रकारातला मोठा वृक्ष आहे. रात्री उमलणार्‍या मोहाच्या फुलांनी बहरलेल्या झाडावरून पहाटेपासून फुले झडण्यास सुरुवात होते. या काळात मनाला तरारी देणार्‍या, उत्साह वाढवणारा मनमोहक मोहाच्या फुलांचा सुगंध (Aroma of flowers) संपूर्ण सातपूडयात दरवळतो.

साधारणतः एक झाड हजाराहून अधिक फुले देतो. जमिनीवर सडयासारखी पडलेली फुले वेचण्यासाठी आदिवासी कुटुंब (Tribal family) अबालवृद्धांसह सकाळपासूनच रानात दाखल होतात. मोहाची फुले वेचण्यासाठी कुटुंबातील सर्वच सदस्य उन्हातान्हाची पर्वा न करता गर्क असल्याचे चित्र आहे. आदिवासी बांधव आपल्या उपजिविकेचे साधन (Means of subsistence) म्हणून वर्षभर मोहाच्या वृक्षांची देखभाल करत त्यातून आपला चरितार्थ चालवतात. महिनाभर आदिवासी बांधवांना उदरनिर्वाहाचे साधन म्हणून मोहाची वृक्षे महत्वाची भूमिका बजावतात. जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबाचे राहणीमान व जीवनमान उंचावण्यासाठी मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत (Human Development Program) ‘मोहफूल-आदिवासी उपजीविकेचे एक साधन’ (Mohful-a means of tribal subsistence) हा प्रकल्प राबविण्यास राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी मंजुरी दिली आहे. जिल्ह्यात वन धन केंद्रामार्फत शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ (Shabari Tribal Finance and Development Corporation) हा प्रकल्प राबविणार आहे. आदिवासी कुटुंबाचे सशक्तीकरण व्हावे आणि ते आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे यासाठी हा प्रकल्प तयार केला आहे.

राज्य शासनाने नुकतेच मोहफुलांवरील निर्बंध हटविले आहेत. मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. मात्र, योजना घोषित झाल्यापासून गेल्या वर्षभरात प्रशासकीय (Administrative) पातळीवर कुठल्याही हालचाली दिसून न आल्याने स्थानिकांमध्ये नाराजीचा सुरु दिसून येत आहे.

आदिवासीचा कल्पवृक्ष मोह

मोहाच्या ((Mohful) वृक्षाचे अनेक फायदे आहेत. अनेक औषधी गुणधर्म (Medicinal properties) असलेल्या मोहाच्या फुलांचा वापर खाण्याच्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. यापासून भाजी व भाकरीतही त्याचा वापर होतो. त्याचप्रमाणे मोहाच्या बीयांपासून तेलही (Oil from seeds) काढले जाते. या तेलाचा वापर स्वयंपाकासाठी केला जातो. फुलांमध्ये कॅल्शियम, जीवनसत्वे व पोषक द्रव्ये भरपूर प्रमाणात असतात. तसेच फुलांचा वापर शुद्ध अल्कोहोल (Pure alcohol) मिळविण्यासाठीही केला जातो.

कच्ची फुले वेचून ती दोन ते तीन दिवस वाळवून स्थानिक बाजारपेठेत 50 ते 60 रुपये प्रती किलो दराने व्यापार्‍यांना (Merchant) विकली जातात. दिवस भरात साधारणतः एका वृक्षापासून 12 ते 15 किलो मोहाची फुले मिळतात. गर्भवती आणि स्तनदा मातांना मोह हे उत्कृष्ट पोषण स्तोत्र आहे. यातून त्यांना चांगले पोषण आहार (Nutrition diet) मिळतो. मोहापासून अनेक घरगुती वापरासाठीची उत्पादने तयार करता येतात.

दुष्काळात दिला मोहफूलांनी आधार

सन 1971 च्या भीषण दुष्काळात सातपूडयात अन्नधान्याचा प्रचंड तूटवडा (Food shortage) असतांना, आदिवासी बांधवांनी रानातील फळे, फूले खावून दूष्काळाचा सामना केला. यात मोहाच्या फूलांची भाजी बनवून खाण्यासाठी मोठया प्रमाणात वापर करण्यात आल्याची माहिती काही वृध्दांनी दिली. मोहाची कच्ची फूले आरोग्यवर्धक (Healthful) मानली जातात तर काही प्रमाणात वाळवलेल्या फूलांपासुन मेण तयार केले जाते.

सध्या लॉकडाऊन शिथिल झाले असले तरी रोजगाराची समस्या कायम आहे. त्यातच सध्या मोहाचा हंगामात महिनाभर रोजगार मिळतो, परंतु यात फुलांना हमी भाव नसल्याने मिळणारे उत्पन्न देखील तुटपुंजे आहे. शासनाने हंगामी फळा फुलांच्या खरेदी विक्रीस परवानगी द्यावी जेणेकरून आदिवासी बांधवाना कायम आर्थिक हातभार लाभेल.मोहफुलांच्या माध्यमातून आदिवासी कुटुंबाचे आर्थिक सक्षमीकरण होणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून मोहफूल प्रक्रिया उद्योग सुरू झाल्यास आदिवासी संस्थाचा व त्या भागाचाही विकास होईल. तसेच आदिवासी बांधवांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांचे जीवनमान उंचावेल.

- इंजि. कविराज तडवी, रा.उमटी ता.अक्कलकुवा

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com