म्हसावद येथे भूकंपाचे सौम्य धक्के

२.८ रिश्टर स्केलची नोंद, भूकंपाचे केंद्र बडवानी
म्हसावद येथे भूकंपाचे सौम्य धक्के

शहादा, ता. प्र.- SHAHADA

तालुक्यातील म्हसावद व मध्यप्रदेश सीमा परिसरातील काही गावाना आज दुपारी १२.५४ च्या सुमारास भूकंपाचे (Mild earthquake) सौम्य धक्के (tremors) बसले. २.८ रिष्टर स्केल ची नोंद करण्यात आली आहे.

नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेवर सरदार सरोवर प्रकल्प उभारण्यात आला असल्याने शहादा तालुका परिसरात नेहमीच भूकंपाचे धक्के बसत असतात. आज दिनांक १९ रोजी दुपारी १२:५४ च्या सुमारास तालुक्यातील म्हसावद येथे भूकंपाचे सौम्य धक्के बसले. भूकंपाची २.८ रिश्टर स्केल एव्हढी नोंद करण्यात आली बडवानी (मध्यप्रदेश) येथे या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेत कोणतीही जीवित व वित्तहानी नसल्याचे तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com