काँग्रेसच्या चार सदस्यांनी आर्थिक स्वार्थापोटी भाजपाशी हातमिळवणी केली

गटनेते सत्यन वळवी यांचा पत्रकार परिषदेत आरोप, बंडखोर सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी
काँग्रेसच्या चार सदस्यांनी आर्थिक स्वार्थापोटी भाजपाशी हातमिळवणी केली

शहादा Shahada । ता.प्र.-

शहादा पंचायत समितीच्या (Panchayat Samiti) सभापती (Chairman)) व उपसभापती (Deputy Chairman)पदाच्या निवडणुकीत बहुमतातील काँग्रेस (Congress) पक्ष्याच्या चार सदस्यांनी आर्थिक स्वार्थापोटी पक्षविरोधी भूमिका घेत भाजपाशी (BJP) हातमिळवणी (handshake) केल्याने काँग्रेसला सत्तेपासून (change of power) वंचित राहावे लागल्याचा आरोप करून काँग्रेसशी गद्दारी (Betrayal of Congress) करणार्‍या या चारही सदस्यांची पंचायत समिती सदस्यत्व रद्द करून (Cancel membership) पक्षांतून हकालपट्टी (Expulsion from parties)करण्याची मागणी गटनेते सत्यन वळवी यांनी पत्रकार परिषदेत केली.

यावेळी सत्यम वळवी यांच्यासमवेत उपगटनेते गुपसिंग पावरा, विजयसिंह पावरा, वैशाली किशोर पाटील, रोहिणी पवार, निमा पटले, कमलबाई ठाकरे, ललिताबाई शेवाळे, रंगलीबाई पावरा बानुमती ईशी हे 14 पैकी दहा काँग्रेसचे पंचायत समिती उपस्थित होते.

गटनेते वळवी पुढे म्हणाले काँग्रेस पक्षाकडून पं.स.सदस्य पदासाठी 28 पैकी 14 सदस्य निवडून आले होते. सोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन सदस्यांचाही पाठिंबा असल्याने बहुमत आमच्याकडे होते.

मात्र चंदनबाई पानपाटील, संगीताबाई पाटील, सरलाबाई ठाकरे व रमणबाई पवार या चार सदस्यांनी पक्ष आदेश झुगारून काँग्रेस पक्षाची साथ सोडत आर्थिक स्वार्थापोटी भाजपाला साथ दिल्याने आमचे संख्याबळ कमी झाल्यामुळेच पं.स.त बहुमत असूनही या चार सदस्यांच्या पक्षविरोधी भूमिकेमुळे सत्ता मिळाली नाही, असा आरोप त्यांनी केला.

या सदस्यांवर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यापुढे कोणताही विश्वास ठेवू नये. या चारही सदस्यांचे सदस्यत्व रद्द करून त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी पक्षाकडे करणार असल्याचेही वळवी यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष विकी पाटील, किशोर पाटील, गणेशराजे पाटील, माजी मंत्री पद्माकर वळवी यांचे स्वीय सहाय्यक गणेश पाटील, दिनेश पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com