पुणे येथे विद्रोही साहित्य-संस्कृती संमेलन

चांदसैली येथे झाली नियोजन बैठक
पुणे येथे विद्रोही साहित्य-संस्कृती संमेलन

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

१४ वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन दि.१० व ११ डिसेंबर रोजी पुणे (pune) येथे घेण्यात येणार आहे. त्या पार्श्‍वभुमीवर चांदसैली ता.शहादा (shahada) येथे नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

बहुजन दलीत आदिवासी, कष्टकरी, स्री, क्षुद्रतिक्षुद्र घटकांच्या जगण्याचे साहित्य व संस्कृतीचे वास्तव जगासमोर मांडण्यासाठी जवळपास २३ वर्षे विद्रोही साहित्य- संस्कृती संमेलन महाराष्ट्राच्या विविध भागात भरवले जाते. प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्रात काम करत आहे. या चळवळीच्या वतीने १९९९ पासून राज्यस्तरीय विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन संघटित करण्यात येते.

पहिले विद्रोही मराठी साहित्य संमेलन धारावी (मुंबई) येथे पार पडल्यानंतर कोल्हापूर, औरंगाबाद, सातारा, सावंतवाडी, पंढरपूर, धुळे, सोलापूर, इंदापूर, सांगली, राहुरी, बीड, शहादा या ठिकाणी संमेलने झाली आहेत.

त्या पार्श्भूमीवर शहादा तालुक्यातील चांदसैली येथे नियोजन बैठक घेण्यात आली. बैठकीचे अध्यक्षा आप. रेखाताई पाडवी होत्या. बैठकीत विद्रोही साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वाहरू सोनवणे, युवा कवी व विद्रोहीचे कार्यकर्ते संतोष पावरा,

श्रमिक चळवळीचे नेते चंद्रसिंग बर्डे, सुभाष नाईक, आदिवासी सांस्कृतिक एकता महसंमेलनाचे माजी अध्यक्ष भिमसिंग पवार, हिरकना सोनवणे, गंगाराम राहसे, जोहरू पाडवी, संजय पाडवी आदी उपस्थित होते.

बैठकीत विद्रोही संमेलनाचे प्रचार प्रसार कसा केला जाईल. जिल्हयातून विविध कला, साहित्य सामाजिक चळवळीचे कार्यकर्ते कवी, साहित्यिक संमेलनात सहभागी करणे, संविधान जतन संवर्धन, लोकशाही व्यवस्था वाजवण्यासाठी साहित्यिक, सामाजिक चळवळ आणि राजकीय नेते यांची भूमिका? आदी अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत हे संमेलन होत आहे. येत्या १० व ११ डिसेंबर २०२२ रोजी साने गुरुजी स्मारक, राष्ट्र सेवा दल येथे होत असलेल्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाला तमाम विद्रोही साहित्यिक, विचारवंत, कलावंत, कार्यकर्ते व जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे बैठकीतून आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com