नवापूर येथे एक लाखाची दारु जप्त

नवापूर येथे एक लाखाची दारु जप्त

नवापूर | श.प्र.- NAVAPUR

नवापूर येथून सोनगडमार्गे (Songad) गुजरात राज्यात (state of Gujarat) अवैधरित्या विक्रीसाठी (illegal sale)जाणारी १ लाखाची दारु (alcohol) नवापूर पोलीसांनी (Nawapur Police ) जप्त केली आहे. याबाबत दोघांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डिसेंबर २०२२ मध्ये गुजरात राज्यात होणार्‍या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीसअधीक्षक पी.आर.पाटील यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सिमेजवळ नवापूरतालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील बेडकी नाका येथे नवापूर पोलीस ठाणे येथील पोलीस अधिकारी वअंमलदार यांच्याकडून नाकाबंदी करण्यात आली आहे.

नवापूर येथे एक लाखाची दारु जप्त
घरकुल अनुदान घोटाळा : एकाच लाभार्थ्याच्या खात्यावर दोन वेळा अनुदान वर्ग

त्याअनुषंगाने नवापुर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारेयांनी बेडकी नाका येथे महाराष्ट्रातूनगुजरात राज्यात अवैध दारु वाहतूक होणार नाही या करीता संशयीत वाहनांची झडती घेवुन कारवाई करण्याबाबततसेच नवापुर पोलीस ठाणे कडील दोन्ही सरकारी वाहनावरील रात्रगस्त पेट्रोलींग ड्युटीचे अधिकारी व अंमलदार हेनाकाबंदीचे आदेश दिले होते.

दि.१६ ते १७ नोव्हेंबरदरम्यान पोलीस उपनिरीक्षक जगदिशसोनवणे, पोलीस शिपाई पंकज सुर्यवंशी, विक्की वाघ यांना ड्युटी लावण्यात आली होती.पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना एका सिलव्हर रंगाची स्कॉर्पीओ गाडी (क्रमांक एम. एच. २० बी. सी. २०३) मध्येदोन इसम देशी विदेशी दारुने भरलेल्या खोक्यांची वाहतूक गुजरात राज्यातनवापुर बाजुकडुन सोनगडकडे घेवुन जाणार असल्याची माहिती मिळाली.

नवापूर येथे एक लाखाची दारु जप्त
Visual Story : गर्लफ्रेंडचे ३५ तुकडे अन् ते १८ दिवस!

त्यानुसार त्यांनी रात्रगस्तीचे पोलीस उपनिरीक्षक अशोक मोकळ यांना कायदेशिर कारवाईचे आदेश दिले. अशोक मोकळ, पोलीस हवालदर दिनेशकुमार वसुले,पोलीस शिपाई प्रशांत खैरनार, चालक किशोर वळवी, हवालदार अल्ताफ शेख, पोलीस नाईक योगेशथोरात यांनी १६ रोजी रात्री २३.५० वाजेच्या सुमारासस्कार्पीओ गाडी नवापूरकडुन सोनगडकडे जाताना मिळून आली.

वाहनाची झडती घेतली असता वाहन चालक भिमसिंग सारादिया गामीत (वय ४२ वर्षे, रा.दोन, पोस्टजामखळी, ता.सोनगढ, जि. तापी, याकुब गुरुजी गामीत (वय ४० वर्षे, रा.सादडकुवा, ता.सोनगड) मिळून आले. वाहनामध्ये सुमारे १ लाख ८०० रुपये किंमतीचे एकुण ३० खोक्यामध्ये एकुण १ हजार ४४० नग देशी दारु,

नवापूर येथे एक लाखाची दारु जप्त
तळोदा येथील वल्लभ सूर्यवंशी यांचा मरणोत्तर देहदानाचा संकल्प
नवापूर येथे एक लाखाची दारु जप्त
Visual Story : भारतातीलच  नव्हे तर आशिया खंडातील ही आहे पहिली डॉक्टर 'मिस वर्ल्ड'

सुगंधी संत्रा, देशी दारुनेभरलेल्या प्लास्टीकच्या बाटल्या, तसेच ४ हजार ४४० रुपये किंमतीचे दोन खोक्या मध्ये एकुण २४ नग टर्बो प्रीमीयम बियरच्या सिलबंद काचेच्या बाटल्या, तसेच ४ हजार ४४० रुपये किंमतीचे दोन खोक्यामध्ये एकुण २४ नग किंगफिशन प्रिमीयम स्ट्रॉंग बिअरच्या सिलबंद काचेच्या बाटल्या,

तसेच ६ हजार २४० रुपये किंमतीचे दोन खोक्या मध्ये एकुण ४८ नग हेवर्ड ५००० स्ट्रॉंग बियरचे सिलबंद टिन, ३ हजार ३६० रुपये किंमतीचे एका खोक्या मध्ये एकुण २४ नग टर्बो प्रिमीयम स्ट्रॉंग बिअरचे सिलबंद टिन असा एकुण १ लाख १९ हजार २८० रुपये किंमतीचा देशी दारु व बिआरचा मुद्देमालमिळून आला.

नवापूर येथे एक लाखाची दारु जप्त
Visual Story : बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट .. सौदी अरेबियामध्ये आफताबसारख्या…

सदरचा माल हा अवैध्यरित्या गुजरात राज्यात विक्री करण्याच्या उद्देशाने त्यांचे ताब्यातील सुमारे४ लाख रुपये किंमतीची स्कॉर्पीओ गाडी (क्रमांक एम. एच. २० बी. सी. २०३) यामध्ये भरुन व कब्जातबाळगून अवैधरित्या विनापास परवाना वाहतूक करित असतांना मिळून आले आहेत.

म्हणून सदर माल व वर नमुदआरोपी यांना ताब्यात घेवून नवापुर पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई विक्की वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक मोकळ करित आहेत.

नवापूर येथे एक लाखाची दारु जप्त
काटवनपाडा येथे वनविभागाकडून ३० हजाराचे सागवानी लाकूड जप्त
नवापूर येथे एक लाखाची दारु जप्त
लोणखेडा येथील नारायणपूरम तीर्थ येथे अमृत भक्ती सत्संग महोत्सव

सदर कारवाई पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, उपअधीक्षक सचिन हिरे, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, उपनिरीक्षक अशोक मोकळ, हवालदार जगदिश सोनवणे,दिनेशकुमार वसुले, अल्ताफ शेख, पोलीस नाईक योगेश थोरात, पोलीस शिपाई प्रशांत खैरनार, किशोरवळवी, पंकज सुर्यवंशी, विक्की वाघ यांच्या पथकाने केली .

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com