कारेघाटच्या जंगलात बोलेरोतून साडे आठ लाखाचा मद्यसाठा जप्त

दोघांविरुद्ध गुन्हा
कारेघाटच्या जंगलात बोलेरोतून साडे आठ लाखाचा मद्यसाठा जप्त

नवापूर | श. प्र. NAVAPUR

नवापूर-लक्कडकोटदरम्यान असलेल्या कारेघाट गावाच्या जंगल ()Kareghat forest area परिसरात खोकरवाडा गावाजवळ (Khokarwada village) बोलेरो गाडीतून ()Bolero Car सुमारे साडे आठ लाख रुपये किमतीचा दारू साठा ()Stock up on alcohol पोलिसांनी (police) जप्त (Seized) केला आहे. याबाबत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गुजरातच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार गुजरात राज्यात अवैधरित्या होणार्‍या दारू वाहतुकीसाठी नाकाबंदी करण्यात आली होती.

महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमेवर तसेच गुजरात राज्यात जाणार्‍या इतर उपरस्त्यावर गस्त घालून कारवाई करण्याचे आदेश नवापूरचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना आदेश देण्यात आले होते. त्यानुसार दि.२० नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५:४५ वाजेच्या सुमारास

पोलीस उपनिरीक्षक अशोक मोकळ, असइ गुमानसिंग पाडवी, पोहेकॉ दिनेश वसुले, दिनेश बाविस्कर, पंकज सुर्यवंशी, विकी वाघ, प्रशांत खैरनार, रणजीत महाले यांचे पथक गस्त घालत होते. दरम्यान, महिंद्रा बोलेरो पिकअप पॅक बोडी (क्रमांक एमएच ३९डी ११८३)

या वाहनातून दोन इसम नवापूरकडून करंजीमार्गाने देशी दारु व बियरचे खोके घेऊन गुजरातमध्ये अवैधरित्या वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना मिळाली.

त्यानुसार, या वाहनाला नवापूर-लक्कडकोट रस्त्यादरम्यान असलेल्या कारेघाट गावाच्या जंगल परिसरात खोकरवाडा गावाजवळ पथकाने अडवले असता, त्यात दारूचा साठा मिळून आला. वाहनाची झडती घेतली असता त्यात ७ लाख ३९ हजार २०० रुपये किंमतीचे एकुण २२० नग खाकी रंगाचे खोके त्यात देशी दारु सुगंधी संत्रा दारु आढळली.

९३ हजार ६०० रुपये किंमतीचे एकुण ३० नग खाकी रंगाचे पुष्ठ्याचे खोके आढळले. त्यात हेवर्ड्स ५००० स्ट्रॉंग प्रिमीयम बियरचे भरलेले सिलबंद पत्री टिन, ४ लाख रुपये किंमतीची एक महिंद्रा बोलेरो पिकअप कंपनीची पॅक बॉडी असलेली पांढर्‍या रंगाची गाडी (क्रमांकएम. एच. ३९ ओ. डी. ११८३) असा एकुण १२ लाख ३२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याबाबत वाहन चालक अबिदखान सत्तारखान सिकलीकर (वय ३७, रा.दोशाह तकीया, जुनी भोईगल्ली नंदुरबार, ह.मु.गल्ली नंबर २, जनतापार्क नवापूर, त्याचा जोडीदार शैलेश कालू राठोड (वय २८ वर्षे, राहणार धनलक्ष्मीपार्क, नवापूर)

यांच्याविरुद्ध पो.कॉ.दिनेश बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपीतांच्याविरोधात नवापूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ (ई), १०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अशोक मोकळ करीत आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com