अवगे येथे वीज पडून सहा एकर ऊस जळून खाक

अवगे येथे वीज पडून सहा एकर ऊस जळून खाक

शहादा (Śahādā) । ता.प्र.-

तालुक्यातील अवगे(Avage) येथील एका शेतकर्‍याच्या शेतात वीज कोसळल्याने (Lightning strikes) सहा एकर ऊस (sugarcane) जळून (burns) खाक झाला. यात शेतकर्‍यांचे सुमारे 10 ते 12 लाख रुपयांचे नुकसान (Damage) झाल्याची घटना बुधवारी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास घडली. प्रत्यक्षदर्शीनी त्या शेतकर्‍याच्या ही बाब लक्षात आणल्याने उर्वरित तीन एकर ऊस जळण्यापासून वाचवण्यासाठी शेतकरी व मजुरांनी शर्थीचे प्रयत्न केले.

तालुक्यातील अवगे येथील संभू देविदास पाटील यांनी पाडळदा रस्त्यालगत नऊ एकर शेतात ऊस लावलेला आहे. बुधवारी (ता.6) दुपारी अडीच तीन वाजेपासून विजेच्या कडकडाटीसह पावसाची रिपरिप सुरू होती. अचानक तीन वाजेच्या सुमारास वीज पडून संभू पाटील यांच्या शेतात उभा असलेला सहा एकर ऊस जळत आहे, असे लगतच्या शेतात काम करीत असलेल्या मजुरांच्या व शेत मालकाच्या लक्षात येताच त्यांनी उसाच्या शेताकडे धाव घेतली. ऊस जळत असल्याच्या बाजूला तीन एकर ऊस चांगला असल्याने अगोदर तो वाचवण्याच्या शेतकरी व मजुरांनी प्रयत्न केला. परंतु सहा एकर ऊस जळून खाक झाला. ऊस तोडणी योग्य झाला असतांना हातातोंडाशी आलेला घास वीजकोसळल्याने हिरावला गेला. अगोदरच शेतकर्‍याने खाजगी, पतसंस्था, विविध कार्यकारी सोसायटी, बँका यांच्याकडून कर्ज उपलब्ध करून शेती व्यवसाय करीत आहेत. काही दिवसात उसाचीदेखील तोडणी होणार होती. परंतु त्या अगोदरच वीज पडून नऊ एकर पैकी सहा एकर ऊस पूर्ण जळून खाक झाला आहे. आज बाजार भाव दहा रुपये देखील किंमत येणार नाही अशी परिस्थिती झाली असून शेतकर्‍यांनी आता करावे तरी काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आधीच डोक्यावर कर्जाचा डोंगर त्यातच ही घटना घडल्याने शेतकरी चिंतातूर आहे.या घटनेची माहिती शहादा तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांना कळताच त्यांनी संबंधित मंडळ अधिकारी व तलाठ्यांना वीज पडून उसाच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com