लक्कडकोट येथील खूनप्रकरणी तिघांना जन्मठेप

लक्कडकोट येथील खूनप्रकरणी तिघांना जन्मठेप

शहादा | ता.प्र.- SHAHADA

दगडाने डोके ठेचुन (Hitting the head with a stone) ठार मारल्याप्रकरणी (case of killing) तिघांना येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे (District and Sessions Court) न्यायाधीश सी.एस.दातीर यांनी जन्मठेपेची शिक्षा (Sentenced to life imprisonment) सुनावली.

तालुक्यातील लक्कडकोट येथील बोला गुलाब ठाकरे आणि संतोष लाशा रावताळे, प्रकाश शिवाजी रावताळे व संदीप मदन तडवी (रा.लक्कडकोट) यांच्यात दि.२६ जानेवारी २०१३ रोजी किरकोळ वाद होऊन हाणामारी झाली होती.

त्याचा राग आल्याने संतोष रावताळे, प्रकाश शिवाजी रावताळे, संदीप तडवी यांनी बोला गुलाब ठाकरे यास मोटरसायकलीवर घेऊन जाऊन राणीपूर रोडवर ईश्वर गणपत बिल यांच्या शेताच्या बांधालगत बुला ठाकरे यांच्याशी हाणामारी सुरू केली व दगडाने ठेचून जीवे ठार मारले.

याबाबत म्हसावद पोलिसात तिघांविरुद्ध भा.द.वि कलम ३०२, ३४ अन्वये मयताची पत्नी आशा बुला ठाकरे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेची माहिती मिळताच म्हसावद पोलीस स्टेशनला तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह परदेशी यांनी आरोपींना अटक केली होती. आरोपीतांविरुद्ध दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते.

सदर खटल्याचे सुनावणीचे कामकाज येथील जिल्हा व सत्र न्यायालयात होऊन यात महत्त्वाच्या सात साक्षीदारांच्या जवाब नोंदवण्यात आले. यात महत्त्वाची साक्ष म्हणून मयताची पत्नी आशा बुला ठाकरे, वडील गुलाब ठाकरे, पंच मदन रावताळे, पंडित ठाकरे, डॉ. राजेंद्र वळवी व तपासधिकारी विजयसिंह राजपूत यांच्या महत्त्वाच्या साक्षी झाल्या.

आरोपितांविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने आरोपी संतोष लाशा रावताळे, प्रकाश शिवाजी रावताळे, संदीप मदन तडवी यांना येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश सी.एस.दातीर यांनी तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अँड. सुवर्णसिंग गिरासे यांनी काम पाहिले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com