५३ मद्यपी वाहन चालकांचे परवाने सहा महिन्यांसाठी निलंबित

नंदुरबार जिल्हा पोलीस दलाची कारवाई
News Update | न्यूज अपडेट
News Update | न्यूज अपडेटNews Update | न्यूज अपडेट

नंदुरबार | दि.१८| प्रतिनिधी NANDURBAR

नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे दारु पिवून वाहन चालविणार्‍या वाहन चालकांवर कारवाई होवून ५३ वाहनचालकांचे परवाने सहा महिन्यांसाठी निलंबीत करण्यात आले आहे. आतापर्यंत १०७ वाहन चालकांचे लायसन्स निलंबित करण्यात आले आहेत.

पोलीस उप-महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र यांनी संपूर्ण नाशिक परिक्षेत्रात दारु पिऊन वाहन चालविणार्‍यांविरोधात विशेष मोहिम राबवून कारवाई करण्याबाबत तसेच रस्ते अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या संख्येमध्ये झालेली वाढ लक्षात घेता .

पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दारु पिऊन वाहन चालविणार्‍या वाहन चालकांविरुध्द वेळोवेळी विशेष मोहिमांचे आयोजन करण्यात आले होते.सदर मोहीम सात्यत्याने सुरु असून त्यात अधिक तिव्रता आणण्यात आली आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत चारचाकी व दुचाकी मोटार सायकल चालकांची तपासणी केली असता काही वाहन चालकांनी मद्यपान केलेले आढळुन आले. त्यामुळे त्यांच्याविरुध्द वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये एकुण १७० गुन्हे मद्यपी चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

अशा वाहन चालकाचा वाहन चालक परवाना निलंबित करण्याची प्रक्रिया नंदुरबार जिल्हा पोलीस दलामार्फत सुरु करण्यात आली होती. त्यात आता नंदुरबार शहर वाहतुक शाखा- २८, नंदुरबार शहर- ०८, उपनगर-०४, विसरवाडी ०१, नवापूर-०२, सारंगखेडा-०२, धडगाव-०५, अक्कलकुवा-०२, तळोदा ०१ असे ५3 वाहन चालकांचे लायसन्स ०६ महिन्यांसाठी निलंबीत करण्यात आले आहेत.

आतापावेतो नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून करण्यात आलेल्या कारवाईमध्ये उप प्रादेशीक परिवहन अधिकारी यांच्याकडून एकुण १०७ वाहन चालकांचे लायसन्स निलंबीत करण्यात आले आहेत. भविष्यात ही मोहीम आणखी तीव्रतेने राबविली जाणार आहे.

दारु पिऊन कोणीही वाहन चालवू नये, दारु पिऊन वाहन चालविणे केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर इतरांचे जिवितास देखील धोकेदायक आहे. नागरीकांनी स्वतःचे व इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीचे नियम पालन करावे. तसेच कोणीही मद्यपान करुन वाहन चालवू नये, असे आवाहन नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com