वण्याविहीर शिवारात बिबट्याचा वासरावर हल्ला

नागरिकांसह शेतकर्‍यांमध्ये भितीचे वातावरण, बिबटयाचा बंदोबस्त करण्याची मागणी
वण्याविहीर शिवारात बिबट्याचा वासरावर हल्ला

खापर । Khapar वार्ताहर-

अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहिर (बुद्रुक) शिवारातील (Vanyavihir Shivara) शेतात 9 मे रोजी रात्री 8.30 च्या सुमारास बिबट्याने हल्ला (Leopard attacks) करून वासराला (calf) ठार करून फस्त केल्याची घटना घडल्याने परिसरातील शेतकर्‍यांसह ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच रात्री वन कर्मचार्‍यांनी (forest workers) घटनास्थळी भेट देऊन नागरिकांना सतर्क केले. सदर बिबट्या (Leopard) हा परिसरात धुमाकूळ घालत असून वनविभागाने त्याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी (villagers) केली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दि.9 मे रोजी रात्री 8.30 च्या सुमारास वाण्याविहीर (बुद्रुक) शिवारातील कोमा सिंगा वळवी यांच्या शेतात गाय व तिचे वासरू बांधलेले असताना अचानक गायीच्या वासरावर हल्ला (Attack on the calf) करून त्याला ठार (Killed) केल्याची घटना घडली. या घटनेचे वृत्त परिसरात पसरताच ग्रामस्थांनी या बिबट्याला पिटाळून लावले. या घटनेची माहिती वन विभागातील कर्मचार्‍यांना (forest workers) कळविण्यात आली. त्यांनीही रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घटनास्थळी भेट देऊन पंचनामा (Panchnama) केला.

परिसरातील शेतकरी तसेच ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. परिसरातील शेतकर्‍यांनी आपल्या शेतातील आपले पशु धन शेतातून आपल्या घरी सुरक्षित ठिकाणी आणले. मृतावस्थेतील वासरूला त्याठिकाणी राहू देण्याचे वन कर्मचार्‍यांनी सांगितल्याने त्याला रात्री तिथेच सोडून देण्यात आले.

रात्री पुन्हा बिबट्याने त्याला सुमारे एक किलोमीटर अंतरावर घेऊन जात त्या वासरूला फस्त केल्याचे सकाळी निदर्शनास आले. सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास वन कर्मचार्‍यांनी पंचनामा केला. बिबट्याच्या संचारामुळे शेतकर्‍यांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे. वनविभागाने त्वरित या बिबट्या चा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी तसेच ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Related Stories

No stories found.