तळोदा शहरानजिक बिबटयाचा शेळीवर हल्ला

नागरिकांमध्ये घबराट
तळोदा शहरानजिक बिबटयाचा शेळीवर हल्ला

मोदलपाडा | वार्ताहर MODALPADA

तळोदा (Taloda) शहराला लागून असलेल्या शेतमळ्यातील शेळीवर (Goat) बिबट्याने (Leopard) रात्री हल्ला (attack) केला. आवाजाने रखवालदाराला (Guardian) जाग आल्याने आरडाओरड (Shouting) केल्यानंतर बिबट्या तेथून पळून गेला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये (citizens) भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तळोदा शहराला लागूनच असलेल्या काकाशेठ गल्लीतील रहिवाशी प्रशांत सुपडू मगरे (माळी) यांच्या महावीरनगर जवळील भरवस्तीतील शेतमळ्यात सोमवारी पहाटे २ ते ३ वाजेच्या सुमारास रखवालदार सोना शिंगा पाडवी यांच्या घराच्या पडवीत बांधलेल्या शेळ्याच्या कळपातील एक शेळीवर बिबट्याने हल्ला केला.

आवाजामुळे रखवालदाराला जाग आल्यावर त्याने आरडाओरड केली. यामुळे बिबट्याने तेथून पळ काढला. जिवाच्या भीतीपोटी रखवालदाराने तिथे फटाके फोडून आवाज केला. बिबट्याने हल्ला केलेल्या शेळीच्या जबड्यावर तालुका पशुवैद्यकीय अधिकारी विश्वास नवले व पशु चिकित्सक नितीन मगरे यांनी टाके घालून उपचार केलेत.

याबाबत शेत मालकाने वनविभाग व पोलिसांना कळविले.वनविभागाचे वनपाल वासुदेव कर्णकार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. परिसरात मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती असून महावीर नगर, खान्देशी गल्ली, साकरलाल नगर तसेच नेमसुशील शैक्षणिक संकुल असून याठिकाणी नागरिक व विद्यार्थ्यांची वर्दळ असते.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने वेळीच दक्षता घेऊन बिबट्यास जेरबंद करण्याची मागणी शेतमालक व नागरिकांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com