खापरखेडा येथील बंधार्‍याला गळती

लाखो लिटर पाण्याची नासाडी,अधिकारी-ठेकेदारांवर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा
खापरखेडा येथील बंधार्‍याला गळती

तोरखेडा Torkheda ता.शहादा । वार्ताहर

शहादा तालुक्यातील खापरखेडा (Khaparkheda) येथे पाटबंधारे विभागातर्फे (Irrigation Department) बांधण्यात आलेल्या केटीवेअर बंधार्‍याचे (KT ware binding) काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे करण्यात आले आहे. या बंधार्‍याच्या गळतीमुळे (Spill) दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान होत आहे. याबाबत संबंधीत अधिकारी व ठेकेदारावर कारवाई (Action) न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकर्‍यांनी (farmers) दिला आहे.

खापरखेडा येथे शहादा लघुपाटबंधारे विभागामार्फत 20 ते 25 लाख रूपयांचा एकच कोटीवेअर बंधारा मंजूर करण्यात आला होता. हा बंधारा 2018-19 च्या दरम्यान मंजूर होवून सदर ठेकेदारास देण्यात आले होते. या बंधार्‍याचे अंदाजे रक्कम 25 ते 30 लाख मंजूर होवून बांधकाम करण्यात आलेले आहे. मात्र लघुपाटबंधारे विभाग शहाद्यातर्फे एका ठेकेदारास देण्यात आले होते. मात्र, या बंधार्‍यात पाणी साठवून न राहता खालून गळती लागली आहे. हा बंधारा पांडुरंग माळी यांच्या शेताजवळच आहे.

या बंधार्‍याजवळ गेले असता रोज रोजचा अंदाज घेतला तर लाखो लिटरच्या वरती पाणी वाया जातांना दिसत आहे. या रोजच्या पाणी वाया जाण्याचा प्रश्न मात्र मार्गी लागला नाही. शेतकर्‍यांचे पाण्यावाचून बरेच प्रश्न निर्माण होणार आहे. बोअरवेल विहिरी आदींची पाणी पातळी खालावण्याची दाट शक्यता आहे. पुढील हंगामासाठी पाणीच शिल्लक राहणार नाही? पिण्याचा पाण्यचा प्रश्न निर्माण होवू शकतो.

खापरखेडा ता.शहादा हे गाव अतिदुर्गम म्हणजे डोंगराळ भागात आहे. या भागांमध्ये पाण्याचा प्रश्न फारच निर्माण होतो. अतिदुर्गम भाग त्यात केटीवेअर बंधारे मंजूर लगेच बांधकामाची लगबग भ्रष्ट अधिकारी ठेकेदारांचे चांगले नाते जुळून आल्याने या कामाची कोण चौकशी करणार? निकृष्ट दर्जाचे काम मात्र तोंड वरती केल्याशिवाय राहत नाही. परंतु खापरखेडा येथील शेतकरी मात्र या गोष्टींचा पूर्ण नायनाट करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. त्यात रणसिंग बाबु भिल, धनसिंग बाबु भिल, युवराज परशुराम भिल, काशीराम शामल्या भिल, अनिल प्रकाश भिल, सरकार रणसिंग भिल, पिण्या जगन भिल, रविंद्र जोतु भिल, रतिलाल नंदु भिल, न्हानबो देवसिंग भिल, पांडुरंग गोविंदा भिल आदी शेतकर्‍यांनी लघु पाटबंधारे विभागाकडे दखल घेतली नाही तर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com