लाटीपाडा ओव्हरफ्लो

पिंपळनेर पश्चिम पट्टयात पाऊस
लाटीपाडा ओव्हरफ्लो

पिंपळनेर Pimpalner । वार्ताहर

पिंपळनेर पश्चिम पट्ट्यात पांझरा नदीच्या (Panjra River) उगम स्थानावर(Place of origin) दोन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे (incessant rains)लाटीपाडा धरण (Latipada dam overflow) ओव्हरफ्लो झाले आहे. सांडव्यावरून पाणी वाहत आहे.

पिंपळनेर व परिसरात अद्यापही जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे. केवळ अत्यल्प स्वरूपाचा पाऊस असून तो पिकांना जीवदान ठरत आहे. मात्र पांझरा नदीच्या उगमस्थानी पश्चिम पट्ट्यातील शेंदवड, मांजरी, उंबर फाटा या भागात दोन ते तीन दिवसांपासून संततधार झालेल्या पावसामुळे पांझरा नदीवरील लाटीपाडा धरण आज सकाळी दहा वाजेला पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहु लागले आहे.

त्यामुळे पिंपळनेर परिसरातून आनंद व्यक्त होत आहे. पिंपळनेर परिसरातील रब्बी पिकाला व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, अशी अपेक्षा जनतेने बोलून दाखवली. पिंपळनेर परिसरातील जामखेली नदीवरील धरण, कान नदीवरील मालगाव धरण काबरा खडक, एमआय टँक पूर्ण क्षमतेने भरले आहेत. पश्चिम पट्ट्यातील लहान-मोठे पाझर तलाव व जलाशय हे देखील पुर्ण भरले आहेत. मात्र शेलबारी धरण अद्यापखाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com