आधी भूसंपादन, मगच काम सुरू करा

जिल्हाधिकार्‍यांच्या कारवाईवर खंडपीठाचे आदेश
आधी भूसंपादन, मगच काम सुरू करा

नंदुरबार । nandurbar

आधी भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करा, जागा मालकांना जागेचा मोबदला द्या नंतरच महामार्गाच्या कामाला सुरुवात करा असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने (Aurangabad Bench) दिले आहेत. जिल्हाधिकारी मनीषा खत्री (Collector Manisha Khatri) यांनी गंगापूर शिवारात दि.1 मे रोजी पोलीस बंदोबस्तात सुरू केलेल्या महामार्गाच्या (Highway) कामाच्या पार्श्वभूमीवर खंडपीठाने हा निकाल दिला आहे.

गंगापूर ता.नवापूर येथे महामार्गाचे काम सुरू आहे. मात्र, भूसंपादनाची प्रक्रिया (The process of land acquisition) बाकी आहे. काही जागा मालकांना अद्याप जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. असे असताना दि.1 मे रोजी जिल्हाधिकारी मनीषा खत्री (Collector Manisha Khatri) यांनी पोलीस बंदोबस्तात गंगापूर शिवारातील गट क्रमांक 45/4/अ, ब, क, 45)3/8 या जागेवर महामार्गाचे काम सुरू केले.

यावेळी संबंधित जागा मालक गोविंद पोसल्या गावित (रा. नानगीपाडा) आणि विलास विजयसिंह वळवी रा. चिंचपाडा यांनी त्यांना जागेचा मोबदला बाकी असल्याचे सांगितले. परंतु आधी काम करू द्या तुमचा मोबदला मिळून जाईल. असे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

यावेळी आ.शिरीषकुमार नाईक यांनीदेखील त्यांना सांगितले परंतु आधी काम करू द्या नंतर बघू असे त्यांनी सांगितले. त्यामुळे जागा मालकानी दि.2 मे रोजी औरंगाबाद खंडपीठात याचिका (क्र.5077/2022) दाखल केली. या याचिकेवर दि.5 रोजी सुनावणी झाली. जोपर्यंत जमीन संपादित होत नाही, जागामालकाना मोबदला मिळत नाही तोपर्यंत महामार्गाचे काम करता येणार नाही असे आदेश खंडपीठाने दिले. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून सुरू असलेले हे काम थांबवण्यात आले आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ऍड. ज्ञानेश्वर बागुल यांनी काम पाहिले.

Related Stories

No stories found.