कुकलटपाडा भर उन्हाळयात झाले जलसमृद्ध

कुकलटपाडा भर उन्हाळयात झाले जलसमृद्ध

रविंद्र वळवी

मोलगी Molgi ।

धडगांव तालुक्यातील अतीदुर्गम भागातील कुकलटपाडा (Kukalatpada) गाव हे मागील वर्षांपर्यंत टंचाईग्रस्त (Scarcity) गांव म्हणून ओळखले जात होते. मात्र गत दोन वर्षांत येथील गावातील तरुणांनी केलेल्या जलसंधारणाच्या (water conservation) कामांमुळे गाव पूर्णपणे जलसमृद्ध (water rich) झाले आहे. या जलसंधारणाच्या कामांमुळे गावातील मृत झरा जिवंत झाला असून चार विहिरींना पाणी आले आहे. त्यामुळे भर उन्हाळयात गावकर्‍यांना गावातच पाणी उपलब्ध झाले आहे.

गेल्यावर्षापर्यंत या गावात फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणी टंचाईचा (Water scarcity) सामना करावा लागत असे. मात्र, याहीवर्षी मार्च महिन्यातच येथील नाला कोरडा पडलेला असतांना ऐन होळीच्या दरम्यान येथील नाल्यातील खडकाच्या एका कपारीतून पाण्याचा झरा (spring of water) फुटून वाहू लागल्याचे गावकर्‍यांना दिसले. सुरुवातीला त्याला होळीमातेचा चमत्कार समजून नागरिकांनी दैवी कृपा मानली. ही घटना येथील जलसाक्षरता समितीचे (Water Literacy Committee) प्रमुख प्राचार्य डॉ.एच.एम.पाटील यांना समजली त्यांनी गावस भेट देवून घडल्या प्रकारची माहिती घेतली व घडलेला प्रकार हा दैवी चमत्कार नसून गेल्या दोन वर्षात गावकर्‍यांनी श्रमदानातून केलेल्या विविध जलसंधारणाच्या (water conservation) कामांचे फलित असल्याचे पटवून दिले.

जलसाक्षरता समितीच्या पुढाकाराने युवक (Young man) सहभागी सुरुवातीला पाच सहा युवकांनी पुढाकार घेत प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. स्वतः श्रमदान करावे लागणार असल्याने सुरुवातीला त्रास झाला. परंतु कुणीतरी पुढाकार घेणे गरजेचे होते. हळूहळू ही संख्या 50 पर्यन्त पोहोचली. हळूहळू गावातील तरुण तरुणी, अबालवृद्धसह महिलांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. सर्वांचीच मतं आणि मनं बदलू लागली.

संपूर्ण गाव सहभागी होवून कामास सुरुवात झाली. साधारणतः दीड ते दोन किलोमीटर उंचीवर डोंगर माथ्यावरील ह्या गावात कामांना सुरुवात करण्याआधी गावाच्या पाण्याचा ताळेबंद विचारात घेण्यात आला. त्यानुसार ठिकाणे निश्चित करून शेत तलाव, (Farm pond) सीसीटी, डिप सीसीटी, दगडी बांध, मातीनाला बांध, नाला खोलीकरण, विहिरीतील गाळ काढणे, बंधार्‍यातील गाळ काढणे अशी कामे आवश्यक तेथे यंत्र व श्रमदानातून झाली. यात साठवण क्षमता तयार होवून प्रत्येक टप्प्यात पाणी अडवून जास्तीत जास्त कसे जिरेल याचा विचार करण्यात आला. यामुळे नेहमी संपूर्ण पावसाळ्यात (rain) वाहून जाणारे पाणी या कामांमुळे नाल्यापर्यंत न पोहोचत जागीच जिरले. त्याने चालूवर्षी नाला हा जणू कोरडाच राहिला.

हातपंपावर भागते तहान

गावात सुमारे 18 ते 20 हातपंप आहेत. जलसंधारणाच्या कामापूर्वी फेब्रुवारी महिन्यातच सर्व हातपंप (Hand pump) बंद पडायचे. यामुळे गावकर्‍यांची व प्रामुख्याने महिलांची मोठी गैरसोय होत असे. संपूर्ण उन्हाळा पाण्यासाठी भटकंती शिवाय कोणतेही काम गावकार्‍यांना नसायचे. त्यातच मे जून महिना तर रात्रभर जगून हंडाभर पाणी (water) मिळत असे. परंतु यावर्षी परिस्थिती उलट आहे. गावातील चार विहिरींची पाणी पातळी वाढून ती आजही टिकून आहे. गावातील चार हातपंपाना मुबलक पानी आहे. यामुळे महिलांना 24 तास सहज व मुबलक प्रमाणात पानी मिळते. बारमाही शेतीतून भाजीपाल्याचे उत्पादन जलसंधारणाची कामे (water conservation) केल्याने गावात भर उन्हाळ्यात मुबलक पानी उपलब्ध झाले आहे. याचा फायदा घेत काही शेतकर्‍यांनी कुपनलिकाद्वारे शेतीला पाणी देत बारमाही शेती सुरू केली आहे. त्यात भाजीपाला उत्पादन सुरू केले आहे. त्यामुळे बारामाही उत्पन्न मिळून येत्या काही दिवसात रोजगारासाठी होणारे स्थलांतरदेखील कमी होण्यास मदत होणार आहे.

यासाठी गावातील पोलिस पाटील रेसिंग भामटा पावरा, माजी सरपंच शिवलाल पावरा, मेरसिंग पावरा, चंद्रसिंग पावरा, बातेसईनग पावरा, अनिल पावरा, टेगा पावरा, कायलूसईनग पावरा, विजय पावरा, जितेंद्र पावरा, सुभाष पावरा, किसान पावरा, रण्या पावरा, आमरसिंग पावरा, संतोष पावरा, दिनेश पावरा, अशोक पावरा, पोपट पावरा, नटवर पावरा, संजय पावरा, रतन पावरा , माधव पावरा, अनिल पावरा, कैलास पावरा, रमेश पावरा आदी ग्रामस्थ व तरुणांच्या पुढकारातून गांव जलसमृद्ध झाले आहे.

Related Stories

No stories found.