नंदूरबार जिल्ह्यातील १५ ते १८ वयोगटातील ९४ हजार मुलामुलींचे कोविड लसीकरण होणार

३ जानेवारीपासून मोहीमेला सुरूवात
नंदूरबार जिल्ह्यातील १५ ते १८ वयोगटातील ९४ हजार मुलामुलींचे कोविड लसीकरण होणार

नंदूरबार - प्रतिनिधी nandurbar

नंदुरबार जिल्ह्यात दि ३ जानेवारी पासून १५ ते १८ वयोगटातील माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच शाळाबाह्य मुला मुलींसाठी कोविड १९ लसीकरण (Covid 19 vaccination) आयोजन करण्यात येणार आहे.

यात जिल्ह्यात एकूण ९४ हजार १२९ मुलामुलींना लस देण्यात येणार आहे.यासाठी नंदूरबार तालुक्यात ४, शहाद्यात २, व अक्कलकुवा,तळोदा नवापूर धडगाव येथे प्रत्येकी एक केंद्र असणार आहे.

याबाबत राज्यस्तरावरून एकूण लोकसंखेच्या ४.८७ टक्के उद्दिष्ठ निश्चित करण्यात आलेले आहे. जिल्ह्यात एकूण ९४ हजार १२९ मुला मुलींना लस देण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्हाधिकारी मनीषा खत्री व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागामार्फत १५ ते १८ वयोगटासाठी दि.३ जानेवारी पासून लसीकरण सुरु करण्यात येणार आहे.

सदर लसिकरणात लाभार्थींना COVAXIN लस देण्यात येणार आहे. नंदूरबार जिल्हयात अक्कलकुवा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय अक्कलकुवा येथे १२ हजार २००, धडगाव येथील ग्रामीण रुग्णालयात १३ हजार ९८४, तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयात ९ हजार ५०४,शहादा तालुक्यात शहरातील नागरी दवाखाना व तालुक्यातील म्हसावद येथील ग्रामीण रुग्णालयात २३ हजार १९, नवापूर उपजिल्हा रुग्णालयात १५ हजार १४८ तर नंदूरबार तालुक्यात शहरातील जे.पी.एन नागरी दवाखाना, नागरी दवाखाना माळीवाडा, जिल्हा सामान्य रुग्णालय नंदुरबार, ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे २० हजार २७३ मुलामुलींचे लसीकरण करण्यात येणार आहे.

सदर उद्दिष्ठ प्राप्त करण्यासाठी सुरुवातीस जिल्हास्तर व तालुकास्तरावर कोविड लसीकरण केंद्र उभारून लसीकरण करण्यात येणार आहे. या करीता सर्वेक्षण पूर्ण करून आरोग्य कर्मचारी यांना लसीकरण बाबत आदेशित करण्यात आलेले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com