दोन वर्षापासुन पळवून घेवून गेलेल्या मुलीची गुजरातमधून सुटका

दोन वर्षापासुन पळवून घेवून गेलेल्या मुलीची गुजरातमधून सुटका

नंदुरबार Nandurbar । प्रतिनिधी-

धडगांव तालुक्यातील भमाने (Bhamane) येथील 2 वर्षापूर्वी अपहरण (kidnapping) करुन पळवून घेवून गेलेल्या मुलीची (girl's)अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध विभागाकडून (Department of Prevention of Unethical Human Trafficking) गुजरातमधून (Gujarat) सुटका (get rid of)करण्यात आली आहे.सदर मुलीस तीच्या आई वडीलांकडे सुपुर्त करण्यात आल आहे.

दोन वर्षापासुन पळवून घेवून गेलेल्या मुलीची गुजरातमधून सुटका
Breaking News : संतनगरीत राहुल गांधी म्हणाले : भाजपा देशात हिंसा पसरवित आहे !

याबाबत अधिक माहिती अशी कि भमाने ता. धडगांव येथील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला झापीचा मांजरी पाडा येथील राहाणारा पुणाश्या आपसिंग चौधरी (नाईक) याने 14 सप्टेंबर 2020 रोजी सायंकाळी 7 वा. सुमारास पळवून नेले म्हणून म्हसावद पोलीस ठाण्यात मुलीच्या वडीलांच्या तक्रारीवरून पुणाशा आपसिंग चौधरी (नाईक) रा. झापीचा मांजरी पाडा ता. धडगांव याच्याविरुध्द म्हसावद पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम 363 प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.

सदर गुन्ह्याचा प्रारंभीचा तपास म्हसावद पोलीस ठाणे यांच्याकडून करण्यात येत होता, परंतु गुन्हा दाखल होऊन बराच कालावधी झाल्यानंतर देखील संशयीत आरोपी व अल्पवयीन मुलगी मिळुन येत नव्हती, म्हणून पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी सदरचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखा अंतर्गत अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षाकडे सोपवून संशयीत आरोपीतास तात्काळ ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणणेबाबत सूचना दिल्या होत्या.

दोन वर्षापासुन पळवून घेवून गेलेल्या मुलीची गुजरातमधून सुटका
VISUAL STORY : वय 55, तरीही तीला पाहताच उरात होतेय 'धकधक'....

अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्ष येथील सहा. पोलीस निरीक्षक नयना देवरे व त्यांच्या पथकाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा बारकाईने अभ्यास करुन संशयीत आरोपी व गुन्ह्यातील अपहरण झालेली अल्पवयीन मुलगी यांच्याबाबत माहिती काढण्यासाठी एक पथक तयार केले.

दोन वर्षापासुन पळवून घेवून गेलेल्या मुलीची गुजरातमधून सुटका
VISUAL STORY : हिरवी साडी, कपाळावर कुंकू, भडक लिपस्टिक झुमके, बांगड्या घालून दिसला ‘हा’ अभिनेता
दोन वर्षापासुन पळवून घेवून गेलेल्या मुलीची गुजरातमधून सुटका
घरकुल अनुदान घोटाळा : दिशा समितीच्या बैठकीत चौकशीचे आदेशः खा.डॉ.हीना गावित

पथकाने संशयीत आरोपीचे गाव झापीचा मांजरी पाडा व गुन्ह्यातील अपहरण झालेली अल्पवयीन पिडीत मुलीचे गाव भमाने ता. धडगांव येथे जावून माहिती घेतली असता आरोपीताने अल्पवयीन मुलीला गुजरात राज्यातील भावनगर जिल्ह्यामधील पछाई येथे पळवून घेवून गेलेला असल्याबाबत खात्रीशिर माहिती मिळाली. म्हणून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्ष येथील सहा. पोलीस निरीक्षक नयना देवरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अमलदारांचे एक पथक तयार करुन तात्काळ पछाई जि. भावनगर येथे रवाना केले.

दोन वर्षापासुन पळवून घेवून गेलेल्या मुलीची गुजरातमधून सुटका
VISUAL STORY : तिच्या सौंदर्यासोबतच तीने दिलेल्या 'या' प्रश्नाच्या उत्तराने 1994 मध्ये ती बनली होती 'विश्व सुंदरी'

पथकाने संशयीत आरोपी याची संपूर्ण माहिती प्राप्त केली असता तो पछाई गावात एका शेतात मजुर म्हणून काम करीत असल्याचे समजले.अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षाच्या पथकाने सुरुवातीस पछाई ता. वल्लभीपूर जि. भावनगर येथे जावून संशयीत आरोपी ज्या शेतात मजुर म्हणून काम करीत होता, त्याबाबत माहिती काढली. तसेच त्याच्या घराच्या आजु-बाजूला वेषांतर करुन अत्यंत योजनापूर्वक सापळा रचला, परंतु संशयीत आरोपीतास पोलीस आल्याची चाहूल लागताच त्याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला परंतु अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षाच्या पथकाने त्यास शिताफीने व गुन्ह्यातील अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले.

दोन वर्षापासुन पळवून घेवून गेलेल्या मुलीची गुजरातमधून सुटका
महिनाभरातील उत्पादनापेक्षा तुपाची दुप्पट विक्री

संशयीत आरोपी पुणाश्या आपसिंग चौधरी (नाईक) रा. झापीचा मांजरी पाडा, ता. धडगांव जि. नंदुरबार यांच्या घरातुन पथकाने अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची सुटका करुन पिडीत मुलीला तिच्या पालकांच्या ताब्यात देवून आरोपीतास गुन्ह्याच्या पुढील तपासकामी म्हसावद पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.नैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षाच्या पथकाचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी अभिनंदन करुन पथकास बक्षीस जाहीर केले आहे. .

दोन वर्षापासुन पळवून घेवून गेलेल्या मुलीची गुजरातमधून सुटका
अरेच्च्या... पैसे घेतल्या शिवाय नगरचना विभागाचे अधिकारी कामच करत नाहीत

तसेच अपहरण झालेल्या मुलीच्या वडिलांनी त्यांच्या मुलीची सुखरुप सुटका केल्याबद्दल नंदुरबार पोलीसांचे अभिनंदन करुन आभार व्यक्त केले आहे. सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षाच्या पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक नयना देवरे, म्हसावद पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस उप निरीक्षक प्रदिपसिंग राजपुत, पोलीस हवालदार विनोद जाधव, महिला पोलीस नाईक अरुणा मावची, तुषार पाटील यांच्या पथकाने केली आहे

दोन वर्षापासुन पळवून घेवून गेलेल्या मुलीची गुजरातमधून सुटका
टवाळखोरांनी बसमध्ये काढली विद्यार्थिनींची छेड

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com