राष्ट्रपती शपथविधी सोहळा ; आ.गिरीश महाजन व जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांच्या उपस्थितीत सातपुड्यात जल्लोष
नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR
दुर्गम भागातील अक्कलकुवा (Akkalkuva) तालुक्यातील गोरजाबारी येथे जिल्हाधिकारी मनीषा खत्री (Collector Manisha Khatri) व भाजपाचे आ. गिरीश महाजन (MLA Girish Mahajan) यांच्या उपस्थितीत (President) राष्ट्रपती शपथविधीचा सोहळयानिमित्त जल्लोष करण्यात आला. तसेच (bjp) भाजपातर्फे तळोदा येथेही जल्लोष करण्यात आला.
अक्कलकुवा तालुक्यातील गोरजाबारी गावात भाजपचे नेते आ.गिरीश महाजन व जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या उपस्थितीत महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधीचा सोहळा जल्लोषात साजरा करण्यात आला.
यावेळी आदिवासी बांधवांनी भर पावसात आदिवासी ढोल वाजवून नृत्य सादर करत आनंद साजरा केला. भाजपचे नेते आ.गिरीश महाजन यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आदिवासी समाजासाठी आज महत्त्वाचा दिवस असून एका सामान्य कुटुंबातील आदिवासी महिला राष्ट्रपती पदावर विराजमान झाल्याने आदिवासी समाजासाठी सन्मानाचा दिवस असल्याचे यावेळी आ.महाजन यांनी सांगितले.

तळोद्यातही जल्लोष
द्रौपदी मुर्मु यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतल्यानंतर तळोदा तालुक्यातील भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.यावेळी परंपरागत आदिवासी व वाद्यावर सर्वांनी ठेका धरला.
आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास बसस्थानकाजवळील बिरसा मुंडा चौकात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, शहरप्रमुख योगेश चौधरी, नगराध्यक्ष अजय परदेशी, उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, किसान मोर्चाचे राजेंद्रसिग राजपुत, प्रदेश सदस्य डॉ.शशिकांत वाणी,
पं.स. सभापती यशवंत ठाकरे, सदस्य विजयसिंग राणा, युवा मोर्चाचे शिरीष माळी, संजय गांधी निराधारचे अध्यक्ष नारायण ठाकरे, नगरसेवक अम्मानुद्दीन शेख, रामानंद ठाकरे, अंबिका शेंडे, माजी जि.प.सदस्य जितेंद्र पाडवी, महिला आघाडीच्या शानू पाडवी आदी उपस्थित होते.
भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आदिवासी ढोल व वाद्यावर बिरसा मुंडा चौकात नृत्य सादर केले. आदिवासी महिला परंपरागत वेशभूषेत शिबली नृत्याने शहरातील नागरिकांना लक्ष वेधले.