Photos # डॉ.विजयकुमार गावितांच्या मंत्रीमंडळातील समावेशामुळे नंदुरबार जिल्हयात जल्लोष

Photos # डॉ.विजयकुमार गावितांच्या मंत्रीमंडळातील समावेशामुळे नंदुरबार जिल्हयात जल्लोष

नंदुरबार Nandurbar | प्रतिनिधी-

राज्याच्या मंत्रीमंडळात (state cabinet) येथील आ.डॉ.विजयकुमार गावित (Dr. Vijay Kumar Gavit) यांची वर्णी लागल्याने नंदुरबार जिल्हयात भाजपा कार्यकर्तेे, पदाधिकार्‍यांसह (BJP workers, including office bearers) समर्थकांनी जल्लोष (Celebrate with joy) साजरा केला.

ना.डॉ. विजयकुमार कृष्णाराव गावित हे नंदुरबार तालुक्यातील नटावद येथील रहिवासी आहेत. १९९५ साली पहिल्यांदा अपक्ष आमदार निवडून आले होते. १९९५ दरम्यान युतीची सत्ता असताना त्यांनी सामान्य प्रशासन, माहिती जनसंपर्क विभाग राज्यमंत्रीपद भुषविले आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर १९९९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता व राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले.

२००४ ते २००९ या काळात त्यांनी आदिवासी विकास मंत्री पद भूषवले. आदिवासी विकास मंत्री असताना विविध योजनांचा लाभ तळागाळात पोहचवल्याने विभाग नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादीमय केला होता. २००९ ते २०१४ दरम्यान त्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून काम पाहिले.

२०१४ साली त्यांची कन्या डॉ.हिना गावित यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रवेश केला. त्यात निवडूनही आल्या. त्यानंतर डॉ. विजयकुमार गावित यांनीही भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.

भारतीय जनता पार्टीत प्रवेशानंतर आदिवासी विकास मंत्री पदावरील भ्रष्टाचाराबाबत त्यांना क्लीन चिट मिळाली. २०१४ व २०१९ मध्ये भाजप पक्षातून निवडणूक लढवून पुन्हा आमदार बनले. नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून सलग सहा वेळा निवडून आले आहेत.त्यामुळे त्यांना आता पुन्हा मंत्रीमंडळात समाविष्ट करण्यात आले आहे.

आयपीआयतर्फे जल्लोष

आ.डॉ. विजयकुमार गावित यांच्या कॅबिनेट मंत्रीपदाच्या शपथविधीनंतर आरपीआय आठवले गटाच्या वतीने फटाके फोडून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

आज मुंबई येथील राजभवनात मंत्रिमंडळ विस्ताराच सोहळा पार पडला. यात आ.डॉ.विजयकुमार गावित यांना स्थान मिळून त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्या पार्श्‍वभुमीवर नंदुरबार येथील त्यांच्या निवासस्थानी रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाच्या वतीने युवक जिल्हाध्यक्ष सुभाष पानपाटील यांच्या नेतृत्वाखाली फटाके फोडून व पेढे वाटून आनंद उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

तळोदा

मोदलपाडा | वार्ताहर

राज्याच्या मंत्रीमंडळात आ.डॉ.विजयकुमार गावित यांचा समावेश झाल्याने तळोदा येथील स्मारक चौकात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केला.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष योगेश चौधरी, नगरसेवक रामानंद ठाकरे, पी.ई. सोसायटीचे संचालक कल्पेश चौधरी, दिपक पाडवी, दीपक चौधरी, नितीन गरुड आदी उपस्थित होते.

आ.डॉ.विजयकुमार गावित यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये अधिकच बळ निर्माण होऊन भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी किरण ठाकरे, प्रवीण चौधरी, हिरालाल मराठे, लढ्या मोरे, सोनू नरभवर यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बोरद

बोरद | वार्ताहर

राज्याच्या मंत्रीमंडळात आ.डॉ.विजयकुमार गावित यांना स्थान मिळाल्याने बोरद येथे भाजपा कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

आ.डॉ.विजयकुमार गावित यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर बोरद येथे भाजपा कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. भाजपा कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरून आपला आनंद व्यक्त केला. यावेळी पंचायत समिती सदस्य विजय राणा, दिपक जाधव, साजन शेवाळे, रवींद्र भिलाव, गौतम भिलाव, राकेश कोळी, रफिक पटेल, अजय ठाकरे, सुरसिंग ठाकरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

जयनगर

जयनगर | वार्ताहर

राज्याच्या मंत्रिमंडळात आ.डॉ विजयकुमार गावित यांना कॅबिनेट मंत्री म्हणून स्थान मिळाल्याने जयनगर सह परिसरातील पंचक्रोशीतील कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

नंदुरबार जिल्ह्याला बर्‍याच वर्षाच्या कालखंडानंतर माजी मंत्री तथा आ.डॉ.विजयकुमार गावित यांची पहिल्याच टप्प्यात कॅबिनेट मंत्रिमंडळपदी नियुक्ती झाल्याने जयनगर येथील त्यांचे खंदे समर्थक तथा महात्मा ज्योतिबा फुले युवा मंचचे अध्यक्ष ईश्वर माळी यांच्यासह कार्यकर्त्यांनी जल्लोष करत संपूर्ण गावात ढोल ताशांच्या गजरात आदिवासी नृत्य करून फटाके फोडून पेढे वाटप केले.

ना.डॉ.गावित यांच्या मंत्रीपदामुळे जिल्ह्याच्या विकासाला अधिकाधिक चालना मिळेल व उर्वरित विकास हा झपाट्याने होईल असे कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले.

माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांचे खंदे समर्थक मानले जाणारे ईश्वर माळी, माजी उपसरपंच किशोर माळी, ग्रा.पं.सदस्य छगन पारधी, माजी सरपंच अर्जुन सोनवणे, तुळशीराम पारधी, मोहन पारधी, विश्वनाथ पाटील, राजाराम पाटील, आर. बी.पाटील, सुदाम माळी, रघुनाथ माळी, संतोष पारधी, कपिल चित्ते, रोहिदास भिल, प्रकाश करंजे, विनोद मोरे, सिद्धांत भिल, विनोद भिल, वैभव पाटील, किरण माळी, आदींसह जयनगर परिसरातील ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.

विश्व आदिवासी दिनी डॉ.विजयकुमार गावित यांना कॅबिनेट मंत्रीपद बहाल केल्याने जयनगर सह परिसरातील झालेला विकास हा दुप्पट होईल खर्‍या अर्थाने आदिवासी बांधवांना अधिकाधिक विकासाच्या प्रवाहात आणतील यात शंका नाही.

- ईश्वर माळी अध्यक्ष महात्मा ज्योतिबा फुले युवा मंच जयनगर

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com