Photos #नंदुरबार जिल्हयात लाडक्या गणरायाचे जल्लोषात आगमन

मानाच्या श्री.दादा व श्री. बाबा गणपतींचीही उत्साहात स्थापना, ढोलताशांचा गजर, गुलालाची उधळण, सर्वत्र चैतन्याचे वातावरण!
 मानाचा श्री दादा गणपती
मानाचा श्री दादा गणपती

नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR

दोन वर्ष कोरोनाच्या महाविनाशक व्हायरसने थैमान घातल्यामुळे सण उत्सव सारेकाही थांबले होते. मात्र, यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona outbreak)बहुतांशी कमी झाल्यामुळे गणरायाचे (Ganaraya) ढोलताशांच्या गजरात (sound of drums), गुलालची उधळण (Gulal's spillage) करत जल्लोषात आगमन (Arriving in jubilation) झाले. दोन वर्षानंतर प्रथमच मोठया प्रमाणावर जल्लोष करण्यात आल्याने उत्सव साजरा करत असल्याचा आनंद नागरिकांच्या चेहर्‍यावर दिसून आला.

मानाचा श्री बाबा गणपती
मानाचा श्री बाबा गणपती

गेल्या दोन वर्षापासून जगभरात कोरोनाने थैमान घातले होते. या महाभयानक व्हायरसने देशातील लाखो लोकांचा जीव घेतला. अनेक बालके अनाथ झाली, अनेकांंचा रोजगार गेला, अनेक प्रतिष्ठाने बंद पडलीत, जीवाभावाची नाती तुटली त्यामुळे ती दोन वर्षे नरकयातनेपेक्षा कमी नव्हती.

मात्र, सुदैवाने यावर्षी या महाविनाशक कोरोनाचा कहर अत्यंत कमी आहे. त्यामुळे शासनाने सर्व निर्बंध हटविले आहेत. परिणामी सण उत्सव जोमात साजरे होत आहे. दोन वर्षांनी प्रथमच मुक्त वातावरणात गणेशोत्सव साजरा होत आहे.

त्यामुळे नागरिकांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. गेल्या आठवडभरापासून जिल्हाभरातील गणेश मंडळांसह अनेक बालगोपाल घरगुती तसेच मंडळाच्या गणरायाच्या आगमनाच्या तयारीला लागले होते.

यंदा गणपतींच्या मुर्त्या काही प्रमाणात महाग असल्या तरीही भाविकांनी त्या खरेदी केली. दोन दिवसांपासून गणपती मुर्त्यांच्या खरेदीसाठी लगबग दिसून येत होती. खेडयापाडयातील नागरिकांनी ट्रॅक्टर, ट्रक, टेम्पो, रिक्षा, बैलगाडयांवर शहरी भागात येवून गणरायांच्या मुर्ती खरेदी केल्या व ढोलताशांच्या गजरात स्थापनेसाठी नेल्या.

बालगोपालांनी हातलॉरी, मोटरसायकल, तसेच हातात धरुन गणरायाला घरी आणले. काही मंडळांनी ढोलताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत मिरवणुकीने गणरायाची स्थापना केली.

जिल्हयात ८९८ मंडळांची स्थापना

जिल्हयात यावर्षी ८९८ गणेश मंडळांकडून श्रींची स्थापना करण्यात येणार आहे. यात ३४६ खाजगी गणपती तर २७८ सार्वजनिक गणपती आहे. ११० गावांमध्ये एक गांव गणपती संकल्पना राबविण्यात येत आहे.

मानाच्या दादा व बाबा गणपतीची स्थापना

नंदुरबार शहरातील प्रथम मानाचा श्री दादा गणपती व श्री. बाबा गणपतींचीही जल्लोषात स्थापना करण्यात आली. दोन्ही मानाच्या गणपतींना शेकडो वर्षांची परंपरा आहे. या गणपतींची विशेषतः म्हणजे, दोन्ही गणपतींची मुर्ती काळया मातीने ज्याठिकाणी स्थापना करण्यात येते, त्याच रथावर तयार करण्यात येते. यासाठी महिनाभराआधीच तयारी केली जाते. शेवटच्या दोन दिवसात त्यांच्यावर रंगरंगोटी करुन अखेरचा हात फिरविला जातो.

एकुणच गणरायाच्या आगमनामुळे जिल्हाभरात उत्साह व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com