जिल्हयात 22 रेशन दुकानांना आयएसओ मानांकन

जिल्हयात 22 रेशन दुकानांना आयएसओ मानांकन

चेतन इंगळे

मोदलपाडा । Modalpada

रेशन दुकानातील (Ration shop) चांगल्या भौतिक सुविधांबरोबरच (Along with the facilities) शासनाचे नियमांचे (Rules of governance) तंतोतंत पालन (compliance) करणार्‍या नंदुरबार जिल्ह्यातील (Nandurbar district) 22 रेशन दुकानाना (Ration shops) जिल्हा पुरवठा शाखेने (District Supply Branch) आयएसओ मानांकन (ISO rating) दिले आहे. यात नंदुरबार तालुक्यातील 12 तर शहादा तालुक्यातील 10 रेशन दुकानांचा समावेश आहे. असे असले तरी इतर दुकानदारांनी (shopkeepers) सुविधांबाबत (Regarding facilities)उदासीन भूमिका घेतल्याने ग्राहकांमधून नाराजीचा (Dissatisfaction from customers) सूर व्यक्त होत आहे.

समाजातील दारिद्र्य व गरीब कुटुंबांना शासनाचा अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून अत्यंत माफक दरात रेशनचे धान्य दिले जात असते. यासाठी नंदुरबार जिल्ह्यातून 1064 स्वस्त धान्य दुकानाना शासनाने मान्यता देण्यात आली आहे. या रेशन दुकानांवर ग्राहकांना चांगल्या भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याचीही ग्राहकांची अपेक्षा आहे. त्यामुळेच शासनाने रेशन दुकानांना यंदापासून आयएसओ नामांकन देण्याचा निर्णय घेतला आहे. या नामांकानासाठी शासनाने भौतिक सुविधा व शासनाचे 90 निकष लागू केले आहेत. सदर निकष पूर्ण करणारे नंदुरबार जिल्ह्यातील 22 रेशन दुकान पात्र ठरले असल्याने त्यांना आयएसओ नामांकन देण्यात आले आहे. यात नंदुरबार तालुक्यातील 12 तर शहादा तालुक्यातील 10 रेशन दुकानांचा समावेश आहे.

असे असले तरी जिल्ह्यात 1064 रेशन दुकान आहेत.त्यातून एवढ्या कमी प्रमाणात रेशन दुकानांना चांगला दर्जा प्राप्त झाला आहे. याचा अर्थ या दुकानांमध्ये भौतिक सुविधांची वानवा असल्याचे दिसून येते. वास्तविक शासन सार्वजनिक वितरण प्रणालीत पारदर्शकता व सुधारणा करण्यासाठी ठोस प्रयत्न करीत आहे. मात्र यात दुकानदारांची उदासीनता खोडा घालत आहे.

असे आहेत मानांकनाचे निकष

शासनाने रेशन दुकानांसाठी खालील निकष निर्धारीत केले आहेत. त्यात इमारतीचे मध्यवर्ती ठिकाण जेणेकरून ग्राहकांना पायपीट करावी लागणार नाही, सभोवतालचे वातावरण, पक्की इमारत, त्यात पुरेशी हवा, लाईट, खिडक्या, पंखे हवे, दुकानाची रंगरंगोटी, प्रशस्त जागा, धान्याला कीड लागू नये म्हणून पेस्ट कंट्रोल, धान्याचे संरक्षण, उंदीर, घुस यांचा उपद्रव, पिण्याचा पाण्याची व्यवस्था, प्रथमोचार पेटी, दुकानाचे नाव, नंबर, दुकानदाराचा गणवेश, ऑनलाईन पेमेंट सुविधा, सुरक्षा अलार्म, अग्नी प्रतिबंधक यंत्र, दक्षता समिती बोर्ड, दुकानाची वेळ, भाव फलक, साठा नोंद वही, हेल्पलाईन नंबर, तक्रार नंबर, अभिप्राय नोंदवही असे वेगवेगळे निकष लागू केले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com