अतिवृष्टीने खराब झालेल्या रस्त्यांची पाहणी

माजीमंत्री के.सी.पाडवी यांची दुर्गम भागाला भेट
अतिवृष्टीने खराब झालेल्या रस्त्यांची पाहणी

मोलगी Molagi । वार्ताहर-

गेल्या पंधरवाड्यात अक्कलकुवा (Akkalkuva) तालुक्यातील अतिदुर्गम भागात (remote areas) मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी (heavy rain) झाल्याने ठिकठिकाणी रस्त्यांची अत्यंत दूरवस्था (Very remote condition of roads) झाली आहे. त्यामुळे माजी मंत्री तथा अक्कलकुवा धडगाव विधानसभा मतदारसंघाचे आ.अ‍ॅड.के.सी.पाडवी (MLA.Adv.K.C.Padvi) यांनी जांगठी, वडफळी पिंपळखुंटा परिसरात भेट देऊन रस्त्यांची पाहणी केली. (inspected)

दि.11 व 12 जुलै व त्यानंतर अक्कलकुवा तालुक्याला अतिवृष्टीने झोडपले. दि.11 व 12 रोजी वडफळी व मोलगी परिसरात एकाच दिवसात सुमारे 600 मिमी पर्यंत पावसाची नोंद झाली. अतिवृष्टीमुळे मोलगी ते पिंपळखुंटा ते वडफळी रस्ता तसेच पिंपळखुंटा, जांगठी रस्त्यावर ठिकठिकाणी दरड कोसळून रस्त्याची अक्षरशः चाळण झाली. मोठमोठ्या दगडांचे मलबे पडुन संपुर्ण रस्ताच बंद झाला.

त्यामुळे नर्मदा परिसरातील नागरिकांना दळणवळणासाठी अतोनात त्रास सहन करावा लागत होता. त्या पार्श्वभूमीवर आ.के.सी.पाडवी यांनी परिसरात भेट देऊन रस्त्यांची पाहणी केली. सोबतच ज्या ज्या ठिकाणी आ.पाडवी यांनी रस्त्याची पाहणी केली त्या त्या ठिकाणाहून त्यांनी मातीचे नमुने घेतले.

दरवर्षी अतिवृष्टीमुळे परिसरात दरड कोसळतात. त्यामुळे रस्ते साफ करतांना व त्या ठिकाणी मदत पोहचवतांना प्रशासनाला देखील मोठ्या तारेवरची कसरत करावी लागते. यावेळी रस्त्याची पाहणी करतांना आ.पाडवी यांनी काही निरीक्षणे नोंदवून कायमस्वरुपी त्यावर काय उपाययोजना आखता येतील, याबाबत मार्गदर्शन केले.

तसेच जांगठी विशेषतः नर्मदा काठाकडील रस्त्यांवर विशेष लक्ष देऊन त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यासंदर्भात आदेशीत केले. यावेळी आ.पाडवी यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती रतन पाडवी, महिला बाल कल्याण सभापती निर्मला राऊत, सीताराम राऊत, हारसिंग पावरा उपस्थित होते.

दरवर्षी अतिवृष्टीमुळे सातपुड्यातील रस्त्यांवर दरड कोसळण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे कोट्यावधी रुपये खर्च करुन तयार करण्यात येणारे रस्ते हे प्रसंगी कुचकामी ठरत असतात. यापुढे रस्ते तयार करतांना येथील डोंगर दर्‍यातील मातीचा प्रामुख्याने अभ्यास करणे गरजेचे झाले आहे. तसेच कायमस्वरूपी रस्त्यांवर दरड कोसळू नयेत यासाठी पहाड पट्ट्यावर विशिष्ट गवत लावणे या सारख्या काय उपाययोजना योजता येतील याबाबत वरिष्ठ पातळीवर आपण चर्चा करणार आहोत तसेच रस्त्यांची गुणवत्ता टिकून राहण्यासाठी मार्ग काढण्यात येईल.

- अ‍ॅड.के.सी.पाडवी आमदार, अक्कलकुवा- धडगाव

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com